भाजपचे समीर देसाई शिवसेनेत (Samir Desai, Shivsena)
मुंबई तक: भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार गुरुदास कामत (Gurudas Kamat nephew) यांचे भाचे आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले समीर देसाई यांनी आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. समीर देसाई […]
ADVERTISEMENT
मुंबई तक: भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार गुरुदास कामत (Gurudas Kamat nephew) यांचे भाचे आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले समीर देसाई यांनी आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
समीर देसाई यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचे प्रवक्तेपद देण्यात आलं होतं. भाजपमधील गटबाजीला कंटाळून देसाई त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. समीर देसाई यांचा मुलगा रौनक देसाई याच्याही मनगटावर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.
हे वाचलं का?
समीर देसाई यांच्या शिवसेनाप्रवेशावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
समीर देसाई हे काँग्रेसचे दोन टर्म नगरसेवक होते. ते मुंबई काँग्रेसच प्रवक्ते होते. तसंच सलग 10 वर्षे ते मुंबई विद्यापिठाचे सिनेट सदस्य होते
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT