उत्तर प्रदेशात सपाची सायकल पंक्चर! मुलायम सिंग यादवांची सून अपर्णा यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशात समाजवादी पक्षाची सायकल पंक्चर करण्याचं काम भाजपने केलं आहे. कारण माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अपर्णा यादव यांनी सपा सोडून भाजपमध्ये जाणं हा समाजवादीसाठी मोठा झटका मानला जातो आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. दिल्लीच्या भाजप कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.

ADVERTISEMENT

भाजपमधल्या तीन मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली. अखिलेश यादव यांच्या खेळीला मुलायम सिंग यादव यांचं घर फोडून भाजपने उत्तर दिलं आहे. हरयाणाचे भाजप प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं होतं की, ‘मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतीक याची पत्नी अपर्णा यादव बुधवार भाजप प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश होईल.’

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव भाजपसाठी तगडं आव्हान निर्माण करत आहेत. अखिलेश यादव यांना अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबाही मिळत असल्याने भाजपसाठी चिंता निर्माण झाली आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप उत्तर प्रदेशात साम, दाम, दंड, भेद हे सगळं वापरताना दिसत आहे. निवडणूक जशी जशी जवळ येईल तशा तशा घडामोडी आणखी गडद होत जातील यात शंका नाही.

ADVERTISEMENT

अपर्णा यादव यांनी 2017 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लखनऊ कँटमधून निवडणूक लढवली होती. यावेळी रिटा बहुगुणी जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अपर्णा यादव BAware नावाची संस्था चालवतात. ही संस्था महिलांसाठी तसंच गायींना निवारा देण्याचं काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांचं कौतुक केल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत होत्या. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रकारे काम करत आहेत त्याचा प्रभाव माझ्यावर पडला आहे त्यामुळे मी भाजप हा पक्ष निवडला आहे आणि भाजपमध्ये आले आहे’ असंही अपर्णा यादव यांनी पक्ष प्रवेशानंतर म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT