महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हं आहेत का?
मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसांमधली जर पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर पॉझिटिव्ह होणाऱ्या रूग्णसंख्येचा आलेख हा चढताच आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. गुरूवारी जी कोरोना रूग्णांची संख्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसांमधली जर पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर पॉझिटिव्ह होणाऱ्या रूग्णसंख्येचा आलेख हा चढताच आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. गुरूवारी जी कोरोना रूग्णांची संख्या समोर आली त्यानुसार राज्यात ३५ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून ही संख्या सातत्याने २५ हजारांपेक्षा जास्त नोंदवली जाते आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले होते?
राजेश टोपे यांनी २२ मार्चला लॉकडाऊनबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. लॉकडाऊनच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावाच लागेल असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. तसंच गरज पडल्यास राज्यातही लॉकडाऊन करावं लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
