देवेंद्र फडणवीस गोव्यात असतानाच केजरीवालांची खेळी; गोवावासियांवर घोषणांचा पाऊस
राजकीय पक्षांना गोवा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपने गोवा विधानसभेची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. सध्या फडणवीस गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यातच आम आदमी पक्षाने मोठी खेळी खेळली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवावांसियांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. गोव्यासह पाच राज्यात निवडणुका होत असून, इतर राज्यांबरोबरच गोव्यातही राजकीय पक्षांनी मोर्चबांधणी […]
ADVERTISEMENT

राजकीय पक्षांना गोवा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपने गोवा विधानसभेची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. सध्या फडणवीस गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यातच आम आदमी पक्षाने मोठी खेळी खेळली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवावांसियांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
गोव्यासह पाच राज्यात निवडणुका होत असून, इतर राज्यांबरोबरच गोव्यातही राजकीय पक्षांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, आज मुख्यमंत्री तथा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या घोषणा केल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘गोव्याच्या विकासासाठी विस्तृत आराखडा तयार केला आहे. गोवा सुंदर आहे, पण राजकीय नेते आणि पक्षांनी गोव्याला फक्त ओरबाडण्याचं काम केलं. ज्याला संधी मिळाली त्याने लुटण्याचं काम केलं. पण आम्ही गोव्याच्या विकाससाठी योजना बनवली आहे’, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
‘काही दिवसांपूर्वी जेव्हा मी गोव्यात आलो होतो, तेव्हा या योजनेतील पहिल्या मुद्द्याची घोषणा केली होती. गोव्यात आपचं सरकार आलं, तर एक मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. ३०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत दिलं जाईल. जुने वीजबिल माफ केले जातील. शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे २४ तास वीज पुरवठा केला जाईल’, असं केजरीवाल म्हणाले.