Shahrukh Khan’s son Aryan Bail: आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगात, कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात तुरुंगात असलेल्या आर्यन खानला आज देखील कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण की, आर्यन खानच्या जामीन अर्जावर जी हायकोर्टात जी सुनावणी झाली आहे ती आज पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही उद्या (27 ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र देखील तुरुंगातच काढावी लागणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात तुरुंगात असलेल्या आर्यन खानला आज देखील कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण की, आर्यन खानच्या जामीन अर्जावर जी हायकोर्टात जी सुनावणी झाली आहे ती आज पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही उद्या (27 ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र देखील तुरुंगातच काढावी लागणार आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जाचं प्रकरण आता हायकोर्टात पोहचलं आहे. यावेळी आर्यनची बाजी माजी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया मुकूल रोहतगी हे लढवत आहेत. आज झालेली सुनावणी पूर्ण न झाल्याने आता ही सुनावणी उद्या देखील सुरु राहणार आहे.

दरम्यान, आज कोर्टात आर्यनच्या वकिलांनी जोरदारपणे त्याची बाजू मांडली. तर दुसरीकडे एनसीबीने आर्यन खानच्या जामीन अर्जाला मात्र, प्रचंड विरोध केला. यावेळी मुकूल रोहतगी यांनी आर्यन खानच्या अटकेबाबत काही सवालही विचारले आहेत.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी दुपारी 2.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, आर्यनच्या जामीन अर्जावर कोर्ट उद्या आपला निर्णय देऊ शकतं.

हे वाचलं का?