नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता खयाली मलिक ठेवावं, आशिष शेलारांचा टोला
नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांची मालिका थांबताना दिसत नाही. अशात आता भाजपचे नेतेही त्यांच्यावर पलटवार करताना दिसत आहेत. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. काय म्हणाले आशिष शेलार? दिवाळीनंतर जो बॉम्ब फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्या आधीच त्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले आहेत […]
ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांची मालिका थांबताना दिसत नाही. अशात आता भाजपचे नेतेही त्यांच्यावर पलटवार करताना दिसत आहेत. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
दिवाळीनंतर जो बॉम्ब फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्या आधीच त्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले आहेत हे त्यांच्या बदलेल्या आवाजावरून दिसत आहे. पण दिवाळीनंतर बॉम्ब फुटेलच. समीर वानखेडे यांना चरित्राचा प्रमाणपत्र देणे हे भाजपाचे काम नाही हे मी स्पष्ट करतो. एनसीबीने ड्रग्जच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. विरोधकांनी विषय भरकवटण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज कितीही प्रमाणात असले तरी जर तो कायद्यामध्ये गुन्हा असेल आणि ड्रग्जच्या मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. ड्रग्ज मिळाले तर एनसीबीने कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे.
सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो समीर वानखेडे यांना चारित्र्याच प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही. ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे. यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/VyzVHrMwsk
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 2, 2021
आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत ती सर्वसाधारण माहिती आहे. ही माहिती तुमचा जावई आत असताना गुप्त का ठेवलीत? हे आरोप नवाब मलिकांनी आज सांगावे असे वाटत असल्याने आठ महिने लपवले असतील. हे आरोप आठ महिने लपवण्याचे कारण काय याचे उत्तर नवाब मलिकांनी दिले पाहिजे असंही शेलार यांनी म्हटलं आहे.