‘त्यांची’ अन् माझी दुश्मनी थोडीच आहे? : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर चव्हाणांचे भाष्य
मुंंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्ममंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही बातमी आली, त्यामुळे चव्हाण खरंच भाजपमध्ये जाणार का असा सवाल […]
ADVERTISEMENT
मुंंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्ममंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही बातमी आली, त्यामुळे चव्हाण खरंच भाजपमध्ये जाणार का असा सवाल विचारला जात आहे?
ADVERTISEMENT
मात्र या सर्व चर्चा आणि बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिले. ते म्हणाले, काँग्रेसची महारॅली, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अशा पक्षाच्या कार्यक्रमासाठी मी पुढील दोन दिवस कामासाठी दिल्लीला जाणार आहे. या दौऱ्यात पक्षश्रेष्ठींच्याही भेटी होणार आहेत.
मात्र ज्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, त्या पूर्णतः विपर्यास करणाऱ्या आणि चुकीच्या आहेत. पक्षाच्या पलिकडे लोकांचे संबंध निश्चितच असतात. ‘त्यांची’ आणि माझी दुश्मनी थोडीच आहे? निमंत्रण आल्यानंतर जावं लागतं भेटावं लागतं. त्याचाच तो एक भाग होता. बाकी कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही, असे म्हणतं अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांचे नाव न घेता या भेटीच्या बातम्यांवर भाष्य केले आहे.
हे वाचलं का?
अशोक चव्हाणांची भाजपशी वाढती जवळीक :
मागील काही काळातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास अशोक चव्हाण भाजपच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच अशोक चव्हाणांसह 9 काँग्रेस आमदार हे शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीलाही सभागृहात अनुपस्थित होते. याशिवाय जूनमधील विधानपरिषद मतदानालाही ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे संशयाची सुई व्यक्त करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार :
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी पुढील विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार काँग्रेस आमदारांच्या प्रवेशानंतर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT