व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला, भाजपच्या माजी नगरसेवकास बेड्या
मिथिलेश गुप्ता, कल्याण: खंडणीप्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी पहाटे कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद यांच्यावर काहींनी प्राणघातक हल्ला केला होता. […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: खंडणीप्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी पहाटे कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद यांच्यावर काहींनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सय्यद गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यात भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी व सतेज पोकळ या लोकांचा सहभाग होता.
सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील करत आहेत. सचिन यांनी किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली होती. याचाच राग मनात धरून अमजद यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हे वाचलं का?
इतकेच नव्हे, तर अमजद यांच्याकडून पैसेही मागण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी सतेज पोकळ याला अगोदरच अटक करण्यात आली होती. सध्या पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
कल्याणच्या जोशीबाग परिसरात राहणारा भूषण जाधव या तरुणाला किरकोळ वादातून मारहाण झाली होती. ही मारहाण भाजपच्या माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी केल्याने सचिन यांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
भूषणने तक्रार केल्यानंतर सचिन खेमा यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते. या परिसरात राहणारा अमजद सय्यद या तरुणाच्या सांगण्यावरुनच भूषणने तक्रार केली आहे असा संशय खेमा यांचा होता. त्यामुळे त्याच्यावर राग काढण्यासाठी 5 जानेवारी रोजी रात्री अमजद सय्यद याच्या घरी काही लोक गेले. त्यांनी त्याला घरातून बाहेर आणून बेदम मारहाण करत त्याच्या पोटात चाकूने हल्ला केला होता.
कल्याण: तरुणावर चॉपरने हल्ला, भाजप नगरसेवकासह 6 जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
हा सर्व प्रकार माजी नगरसेवक सचिन खेमाचे भाऊ नितीन खेमा आपले साथीदार प्रेम चौधरी, सतेज पोकळ उर्फ (बाळा), आणि बबलू माजिद शेख यांच्यासोबत मिळून सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून केला असल्याचे पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी भाजप माजी नगरसेवक सचिन खेमा त्याचा भाऊ नितीन खेमा, त्याच्यासोबत प्रेम चौधरी, सतेज पोकळ, बबलू शेख व अन्य एक तरुणाविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT