'फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्री बनवतील आणि...'; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!

रोहिणी ठोंबरे

Uddhav Thackeray Exclusive statement : उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो', असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uddhav Thackeray Exclusive statement : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिल रोजी पार पडलं. सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू असताना राजकारणात एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाला प्रचंड वेग आला आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठे खुलासेही यातून उघड होत आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एक मोठा दावा केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे. 

त्यांनी मला माझ्या लोकांसमोर लबाड पाडलं- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो, असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, त्यांनी मला माझ्या लोकांसमोर लबाड ठरवलं.' असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन मला स्वतः अमित शाहांनी दिलं होतं याचा पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर 'मला भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'काँग्रेसही विरोधात उभा राहिला आहे. 2023 पर्यंत लोक बोलायला घाबरत होते, आता नाही. आता लोकशाही धोक्यात आल्याचे त्यांना वाटते. राहुल गांधी किंवा मी बाहेर पडलो तर लोकांना भाजपच्या विरोधात कोणीतरी आहे असे वाटते, त्यांनाही खोट्या आश्वासनांविरुद्ध बोलण्याची हिंमतही मिळते'

भाजप धर्म आणि श्रीरामाच्या नावाने मतं मागतं

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही आणि फक्त प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मतं मागितली आहेत. मी काल एक यूट्यूब व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारले गेले की, त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळाले आहेत का? तर शेतकरी म्हणाला की,मला सरकारकडून 6000 रुपये मिळाले आहेत, पण मी एका वर्षात खतासाठी 1 लाख रुपये आणि 18 टक्के, 18,000 रुपये जीएसटी देतो. त्यामुळे  सरकारचे माझ्याकडे 12,000 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा पराभव होणार.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp