वारंवार ATM मध्ये जाण्याची सवय बदला! 1 जानेवारीपासून पडणार महागात
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. तसंच बँकांच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून मोफत मर्यादेनंतर एटीएम व्यवहारांवर शुल्क वाढवण्यास RBI ने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एटीएममधून मोफत व्यवहारांनंतर करण्यात येणाऱ्या व्यवहारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. RBI ने 1 जानेवारी […]
ADVERTISEMENT

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. तसंच बँकांच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून मोफत मर्यादेनंतर एटीएम व्यवहारांवर शुल्क वाढवण्यास RBI ने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एटीएममधून मोफत व्यवहारांनंतर करण्यात येणाऱ्या व्यवहारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
RBI ने 1 जानेवारी 2022 पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम (ATM) व्यवहारांवर लागू होणारे शुल्क मोफत मासिक मर्यादेपेक्षा वाढवण्याची परवानगी दिली आहे. RBI च्या सूचनेनुसार, Axis Bank ने आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2022 पासून 21 रुपये शुल्क आणि GST भरावा लागेल असा मेसेज (SMS) पाठवण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी हे शुल्क 20 रुपये होते.
जानेवारीमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची लॉटरी; महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळणार?
बँकांनी नेमकं का वाढवलं आहे शुल्क?