काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ, खुर्शीद म्हणाले हा तर हिंदू धर्मावरचा हल्ला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. सलमान खुर्शीद यांच्या सनराईज ओव्हर अयोध्या या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हराम सोबत केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे.

ADVERTISEMENT

अशात आज सलमान खुर्शीद यांनी फेसबुक त्यांच्या घराला आग लागल्याचे फोटो आणि काचा फोडण्यात आल्याचे फोटो शेअर केले आहेत. तसंच त्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

काय म्हटलं आहे सलमान खुर्शीद यांनी?

हे वाचलं का?

मी माझ्या पुस्तकात असे म्हटले आहे की जे लोक अशा गोष्टी करतात ते हिंदू धर्माचे नाहीत. हिंदू धर्म हा एक सुंदर धर्म आहे ज्याने या देशाला एक विलक्षण संस्कृती दिली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे. मला हिंदू धर्मावर गर्व आहे. जाळपोळीच्या घटनेने हे सिद्ध केले की मी योग्य होतो. अशा लोकांना हिंदू धर्माशी काही घेणंदेणं नसतं. हा हल्ला माझ्यावर नाही हिंदू धर्मावर आहे. माझ्या पक्षाने माझ्या म्हणण्याचं समर्थन केलं आहे. पक्षाच्या प्रमुखांनी माझ्या बोलण्याला योग्य म्हटलं आहे. माझे दरवाजे खुले आहेत, ज्यांना हवं ते येऊ शकतात.

या घटनेप्रकरणी राकेश कपिल आणि अन्य 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुमाऊचे डीजीआय नीलेश आनंद यांनी दिली आहे. ‘दहशतवादी संघटना आयसीस आणि हिंदुत्व एकच आहेत असे मी माझ्या पुस्तकात म्हटले नाही. पण दोन्ही एकसारख्या आहेत, असं मी म्हटलंय. ISIS आणि बोको हराम इस्लाम धर्माचा गैरवापर करतात, असंही मी म्हटलंय. परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. मी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, असे कोणीही म्हटले नाही.’ असंही खुर्शीद यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत सलमान खुर्शीद?

मी आता देखील चुकीचा आहे का? हे हिंदुत्व असू शकतं का? तसेच, तर आता अशी चर्चा आहे. लाच हा अतिशय कमकुवत शब्द आहे. याशिवाय मला आताही आशा आहे की आपण एकदिवस एकत्रितपणे चर्चा करू आणि असहमत असल्यास सहमत होऊ शकतो. असं देखील ते दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT