Nashik: दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी रिक्षाचालकाने घरालाच लावली आग
नाशिक: नाशिकमधील मखमलाबाद येथे दोन बहिणींना जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेनगर परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघी बहिणी गंभीररित्या जखमी झालं असल्याचं समजतं आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) ही घटना घडली आहे. या घटनेत घरातील फर्निचरसह अनेव वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग याच भागातील एका रिक्षाचालकाने लावली असल्याची प्राथमिक […]
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिकमधील मखमलाबाद येथे दोन बहिणींना जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेनगर परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघी बहिणी गंभीररित्या जखमी झालं असल्याचं समजतं आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) ही घटना घडली आहे. या घटनेत घरातील फर्निचरसह अनेव वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
ही आग याच भागातील एका रिक्षाचालकाने लावली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, आरोपीने असे भयंकर कृत्य कोणत्या कारणामुळे हे अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप गौड हे आपल्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह शिंदेनगरमधील भाविक बिलाजियो या सोसायटीत राहतात. गौड यांच्या आई-वडिल, भाऊ, मुले पुतणे असे एकूण दहा जण राहतात. मंगळवारी प्रदीप यांची मावशी भारती गौड (वय 55) या बारा वाजेच्या सुमारास प्रदीप यांच्या घरी आल्या होत्या. त्याच वेळी एक रिक्षावाला त्यांच्या पाठोपाठ घरी आला आणि त्याने थेट भारती गौड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.