कॉन्स्टेबलचा पत्नीशी वाद, बायकोवर केला तव्याने हल्ला, लेकीची हत्या करून नदीत उडी मारत स्वत:ला संपवलं

मुंबई तक

crime news : पत्नी शिवानी ही आपल्या लहान मुलीसोबत राहत होती. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती दिवशी कुटुंबात मोठा अनर्थ घडल्याचं वृत्त आहे. कौटुंबिक कलहातून गौरवने रागाच्याभरात शिवानीवर लोखंडी तव्याने हल्ला केला होता. यादरम्यान, लहान मुलीची देखील हत्या केली. यानंतर गौरव घटनास्थळावरून फरार झाल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीकडून बायकोवर तव्याने हल्ला

point

नंतर पोटच्या चिमुरडीला संपवलं

point

धक्कादायक कारण आलं समोर

crime news : उत्तर प्रदेशातील बांदा येथील मार्का पोलीस ठाणे परिसरातील गौरव यादव नावाच्या एका कॉन्स्टेबलने आपल्याच चिमुकलीला संपवलं. नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत सणादिवशी कुटुंबात मोठा अनर्थ घडल्याचं वृत्त समोर आलं. कौटुंबिक कलहातून गौरवने पत्नी शिवानीवर तव्याने हल्ला चढवला होता. यादरम्यान, लहान मुलीची देखील हत्या करण्यात आली. यानंतर गौरव हा घटनास्थळावरून फरार झाला, नंतर पाण्यात उडी मारत त्यानं आपलं जीवन संपवलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी शोध घेतला असता, नदीत त्याचा मृतदेह आढळून आला होता. 

हे ही वाचा : संतापलेल्या बायकोनं नवरा झोपेत असताना जीभच कापली, नेमकं कारण काय?

पतीकडून बायकोवर तव्याने हल्ला

शिवानीवर तव्याने हल्ला केल्यानं तिची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी गौरवचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो कुठेही सापडला नाही, पण आता गौरव यादव सापडल्याचं वृत्त आहे. दरम्यान एक बाब लक्षात घ्यावी लागेल, जेव्हा पोलीस आणि कुटुंबियांनी गौरवचा शोध सुरु केला, तेव्हा यमुना नदीजवळ त्याचे कपडे आढळून आले होते. 

गौरवने नदीत उडी मारत आपलंच जीवन संपवल्याचा संशय होता. हा संशय खरा ठरला असून, घटनेच्या काही दिवसांतच पोलिसांनी गौरव यादवचा मृतदेह यमुना नदीतून बाहेर काढल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर गौरवने त्याच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला होता. या कथित घटनेची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. 

'मी खूप मोठी चूक केली..'

संबंधित ऑडिओत गौरव म्हणतो की, 'मी खूप मोठी चूक केली, आज शिवानीशी माझा वाद झाला होता, ती मला सतत चिथावत असायची. तिने मला अनेकदा चिथावलं. माझा गणवेश देखील फाडून टाकला. त्यानंतर मी शिवानीच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला'. हा ऑडिओ गौरवने नदीत उडी मारण्यापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp