संतापलेल्या बायकोनं नवरा झोपेत असताना जीभच कापली, नेमकं कारण काय?

मुंबई तक

Crime News : मोदीनगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्री पत्नीने आपल्याच नवऱ्याची जीभ कापली. यानंतर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या जोडप्याचे काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पीडित पतीच्या कुटुंबाने आरोपी सुनेविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्वयंपाकावरून नवरा-बायकोमध्ये वाद

point

संतापलेल्या बायकोनं नवरा झोपेत असताना जीभच कापली

Crime News : गाझियाबादमधील मोदीनगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्री पत्नीने आपल्याच नवऱ्याची जीभ कापली. यानंतर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या जोडप्याचे काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पीडित पतीच्या कुटुंबाने आरोपी सुनेविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली. 

हे ही वाचा : 'मॅडम इथं दुखतंय...', अंगणवाडीतील चिमुकलीने शिक्षिकेला सांगितलं अन् मोठ्या दादानेच अत्याचार केल्याचं समोर

स्वयंपाकावरून नवरा-बायकोमध्ये वाद

घडलेल्या घटनेनुसार, मोदीनगरच्या संजयनगर वसाहतीत रात्री स्वयंपाकावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याच भांडणात पत्नीने आपल्या पतीची जीभ चावली. त्याच गंभीर अवस्थेत त्या व्यक्तीला मेरठमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान पीडित पतीचं नाव विपिन आहे.

हे ही वाचा : शनीच्या भ्रमणामुळे 'या' लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, आजपासून 'काही' राशीतील लोकांचे बदलणार भाग्य

विपिनने पत्नीच्या कानशीलात लगावली अन्..

सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये जेवणावरून वाद निर्माण झाला होता. याचदरम्यान पती विपिनने पत्नीच्या कानशीलात लगावली. संबंधित तरुणाच्या आईनं माहिती दिली की, दोघेही आपल्या खोलीत झोपायला गेले होते. तेव्हा घरातून आरडाओरड करण्याचा आवाज आला होता. काही लोकांनी धाव घेतली असता, विपिनच्या तोंडातून रक्त येत होते. तेव्हा काही लोकांनी त्याला एका नजीकच्या रुग्णालयात नेले, परिस्थिती बघता     त्याला मेरठच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp