किर्ती मोटे हत्याकांड: ‘आरोपी मुलाला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरु’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील किर्ती मोटे-थोरे हिच्या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ऑनर किलिंगची ही घटना एवढी भयंकर होती की, त्यातून पीडित कुटुंबीय अद्यापही सावरु शकलेले नाहीत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लाडगाव येथे जाऊन थोरे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘किर्ती हिची निर्घृण हत्या करणारा तिचा भाऊ हा अल्पवयीन नसून सज्ञान आहे. पण त्याला अल्पवयीन दाखविण्याची धडपड सुरु आहे.’ असा गंभीर आरोपी चित्रा वाघ यांनी यावेळी केला आहे.

ADVERTISEMENT

चित्रा वाघ यांनी नेमका काय आरोप केला?

‘प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पोटच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावाने मिळून मुंडकं कापून हत्या केली. औरंगाबादच्या वैजापूरमधल्या या घटनास्थळी भेट दिली.’

हे वाचलं का?

‘आरोपी मुलगा सज्ञान आहे. परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे. यात पोलीस निरीक्षकाची भूमिका संशयास्पद आहे.’

‘राज्यात होणारे ॲानर किलिंग सरकारसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी निंदास्पद आहे. तातडीनं सासरच्या लोकांना सुरक्षा पुरवण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली आहे.’

ADVERTISEMENT

‘ॲानर किलिंग होऊ नये यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारनं ठोस पाऊल उचलावं.’ असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार त्याला बाल न्यायमंडळात देखील पाठविण्यात आलं आहे. मात्र, चित्रा वाघ यांनी केलेल्या दाव्यानंतर आता याप्रकरणी प्रशासन काही हस्तक्षेप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकी घटना काय?

वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे व नगिनापिंपळगाव येथील किर्ती उर्फ किशोरी मोटे या दोघांनी 21 जून 2021 रोजी प्रेमविवाह केला होता. 19 वर्षीय किर्तीने पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला किर्तीच्या कुटुंबाचा विरोध होता. मात्र, हळूहळू सर्व सुरळीत होईल या आशेने दोघंही औरंगाबादेतील लाडगाव परिसरातील शेतवस्तीवर राहण्यासाठी आले होते.

किर्ती शेतवस्तीवर राहायला आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचा भाऊ आणि आई शोभा मोटे भेटायला आले. यावेळी तिचा आजारी असलेला पती झोपलेला होता. आई आणि भाऊ भेटायला आल्याने किर्तीने आधी पाणी दिले आणि नंतर चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. किर्ती किचनमध्ये गेल्यावर तिच्यापाठोपाठ भाऊ आणि आईही किचनमध्ये गेले.

त्यानंतर किर्तीला ‘तू पळून प्रेमविवाह का केला?’ असं त्याने विचारलं. त्यावरून शाब्दिक वाद झाला आणि आईने किर्तीला पकडलं. त्यानंतर तिच्या भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने थेट तिच्या गळ्यावरच वार केला. शिर धडावेगळं केल्यानंतर आरोपीनं क्रौर्याचा कळसच गाठला.

धडावेगळं केलेलं बहिणीचं शिर घेऊन आरोपी भाऊ घराबाहेरच्या ओट्यावर आला. यावेळी बाहेर असलेल्या लोकांना शिर दाखवत म्हणाला, ‘हीच काय केलं पहा’, असं म्हणाला. दरम्यान, किर्तीचं शिर बाहेर आणण्याआधी आरोपी किर्तीचा पती असलेल्या खोलीत तिचा भाऊ गेला. मात्र, तोपर्यंत किर्तीच्या आवाजाने तो जागा झाला होता. समोर कोयता घेऊन उभ्या असलेल्या भावाला बघून त्याने पळ काढत स्वतःचा जीव वाचवला.

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

दरम्यान, याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपी आई ही पोलीस कोठडीत आहे तर आरोपी मुलगा हा बाल न्यायमंडळाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT