Viral : पत्नीच्या नाराजीचा पतीला झाला फायदा; एकावेळी लागल्या दोन लॉटरी
ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला पत्नीच्या नाराजीतून लाखो डॉलर्सचा फायदा झाला आहे. भारतीय चलनात ही किंमत १० कोटींच्या घरात आहे. आपल्या चिडलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी त्या व्यक्तीने समान क्रमांक टाकून दोन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. यानंतर, दोन्ही तिकिटांवर पतीला जॅकपॉट लागला. या दोन्ही तिकिटांवर मिळून 2 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, 10 कोटी 76 लाख […]
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला पत्नीच्या नाराजीतून लाखो डॉलर्सचा फायदा झाला आहे. भारतीय चलनात ही किंमत १० कोटींच्या घरात आहे. आपल्या चिडलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी त्या व्यक्तीने समान क्रमांक टाकून दोन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. यानंतर, दोन्ही तिकिटांवर पतीला जॅकपॉट लागला. या दोन्ही तिकिटांवर मिळून 2 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, 10 कोटी 76 लाख 15 हजार) मिळाले आहेत. (Australian man wins two million in lottery because of her angry wife)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
खरंतरं, पतीने एक आठवड्यापूर्वी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. या तिकिटांवर पत्नीने नमूद केलेला नंबर न टाकता पतीने आपल्या मनात नंबर टाकला, त्यामुळे पत्नी चांगलीच संतापली. आपल्या चिडलेल्या बायकोला शांत करण्यासाठी नवऱ्याने पुढच्या आठवड्यात दोन लॉटरीची तिकिटे घेतली आणि दोन्हीवर एकच नंबर टाकला आणि ड्रॉसाठी जमा केला.
हे वाचलं का?
News.com.au च्या बातमीनुसार, लॉटरी जिंकल्यानंतर पती म्हणाला, ‘आम्ही २ तिकिटांवर एकच नंबर का टाकला याची गोष्ट खूप मजेशीर आहे. मागच्या आठवड्यात मी तिकिटावर बायकोचा नंबर टाकायला विसरलो. या गोष्टीमुळे ती माझ्यावर रागावली होती. त्यामुळे या आठवड्यात मी तिचा नंबर दोनदा ड्रॉमध्ये टाकायचा विचार केला.”
56 ब्लेड गिळणारा ‘हा’ आहे तरी कोण?, डॉक्टरांनी ‘असे’ वाचवले प्राण
ADVERTISEMENT
पत्नी मागच्या 30 वर्षांपासून लॉटरीत तोच नंबर टाकून आपलं नशीब आजमावत आहे. पण आता पत्नीच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि दोन्ही तिकिटांचा जॅकपॉट लागला आहे. पण पत्नीला हे माहित नव्हतं की मी तिने दिलेल्या क्रमांकावरून सोडतीसाठी एक ऐवजी दोन तिकिटे सादर केली आहेत. आता माझा विश्वास बसत नाही, आम्ही इतकी मोठी रक्कम जिंकली आहे.
ADVERTISEMENT
mumbai crime : लालबाग हादरलं! कपाटात सापडला महिलेचा मृतदेह, मुलीला अटक
‘पती-पत्नीला या पैशातून त्यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे. पत्नी म्हणाली, ‘मी या पैशाने घर घेऊ शकते. हे पैसे मी माझ्या मुलांच्या आणि नातवंडांच्या भविष्यासाठीही खर्च करेन. ”न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, 18 लाख 45 हजार लोकांपैकी एक व्यक्ती लॉटरी जिंकण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT