उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 430 लोकांना सैन्यदलाने वाचवलं, 8 जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तराखंडमधल्या चामोलीत मोठी दुर्घटना घडली आहे. भारत चीन सीमेजवळ सुमना भागात ITBP च्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाल. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तातडीने बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. हिस्मस्खलन झाल्याने त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. आत्तापर्यंत 430 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. जवानांनी 430 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं आहे.

ADVERTISEMENT

भारतीय लष्कराने आत्तापर्यंत 430 जणांचे प्राण वाचवले आहेत. तरीही आणखी सुमारे 400 जण बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. भारतीय लष्कराचं मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हिमस्खलन हे ITBP च्या छावणीजवळ झालं नाही. आर्मी कॅम्प सुरक्षित आहे. वाचवण्यात आलेल्या 430 जणांना रेस्क्यू ऑपरेशन कॅम्पमध्ये आणण्यात आलं. त्यातले 384 लोक परतले आहेत. इतर कोण कोण बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे त्याचा शोध सुरू आहे. आत्तापर्यंत आम्हाला ८ मृतदेह सापडले आहेत. उत्तराखंडच्या डीजीपींनी ही माहिती दिली आहे.

उत्तराखंडमध्ये जे लोक हिमस्खलनामुळे अडकले त्यांना वाचवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्सही वापरली जात आहेत. सुमोना भागात जे हिमस्खलन झालं तिथल्या लोकांना तिथून एअर लिफ्ट केलं जातं आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर आर्मी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT