गर्दी नको, बेफिकीरीतून वाढलेला कोरोना संसर्गही नको! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई तक

थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नव वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला केले आहे.

Mumbai Covid cases : मुंबईतील कोरोना रुग्णवाढ का आहे चिंता वाढवणारी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे संदेशात ?

नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता- म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हिच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.

कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होते आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचप्रमाणे ओमिक्रॉन रूग्णांचंही प्रमाण वाढतं आहे. महाराष्ट्रात 198 नव्या ओमिक्रॉन रूग्णांची नोंद गुरूवारी झाली. या त्यामधले 190 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले. त्यामुळे अधिक काळजी घेतली जाते आहे. मुंबई पोलिसांनी आज नवे नियमही लागू केले आहेत. जे 15 जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी जमण्यास संध्याकाळी ५ ते पहाटे ५ या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत कलम 144 ही लागू करण्यात आलं आहे. अशात नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठीचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp