बच्चू कडूंचा चढला पारा! ‘शांत बस’ म्हणत लगावली कानशिलात; प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वीच जुन्या प्रकरणात जामीनावर सुटलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा वादात सापडले आहेत. बच्चू कडूंचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. २०१८ मधील मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात जामीन मिळालेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारामुळे चर्चेत […]
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच जुन्या प्रकरणात जामीनावर सुटलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा वादात सापडले आहेत. बच्चू कडूंचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्यक्ती प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.
२०१८ मधील मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात जामीन मिळालेले आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारामुळे चर्चेत आलेत. अमरावतील जिल्ह्यातल्या गणोजा गावात हा प्रकार घडला आहे.
बच्चू कडूंनी कानशिलात का लगावली?
बच्चू कडू एका व्यक्तीच्या कानशिलात मारत असतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार बच्चू कडू गणोजा येथे उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या कामावरून तिथे वाद झाला.
व्हिडीओत बच्चू कडू यांच्यासमोर दोन व्यक्ती बोलत आहे. त्यातल्या एका व्यक्तीला बच्चू कडू ऐकून घे आधी, शांत बस असं म्हणत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं बोलणं सुरूच होतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात लगावली.










