रेखा जरेंची हत्या ते बाळ बोठेची अटक, जाणून घ्या घटनाक्रम
महाराष्ट्रातला नगर जिल्हा आणि नगर जिल्हातली पुणे – नगर महामार्गावरची ही घटना, एक कार चाललेली असते, कारला दोन दुचाकी स्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात कारचालक आणि दुचाकी स्वारांमध्ये बाचाबाची होते. दुचाकी स्वार गाडी आडवी घालून कार थांबवतात आणि कारमध्य़े बसलेल्या महिलेचा गळा चिरुन हत्या करतात. पोलीस घटनास्थळी येतात. हत्या झालेली महिला साधीसुधी नसते तर नगर […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातला नगर जिल्हा आणि नगर जिल्हातली पुणे – नगर महामार्गावरची ही घटना, एक कार चाललेली असते, कारला दोन दुचाकी स्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात कारचालक आणि दुचाकी स्वारांमध्ये बाचाबाची होते. दुचाकी स्वार गाडी आडवी घालून कार थांबवतात आणि कारमध्य़े बसलेल्या महिलेचा गळा चिरुन हत्या करतात.
पोलीस घटनास्थळी येतात. हत्या झालेली महिला साधीसुधी नसते तर नगर जिल्हातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असते. पोलीसांच्या तपासाची चक्र फिरु लागतात. 48 तासांच्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातात.
सुरुवातीला बाचाबाचीतून झालेली ही हत्य़ा वेगळेच वळण घेते आणि आरोपींनी रिमांडमध्ये घेतल्या आरोपींच्या तोंडून ज्यांचे नाव बाहेर पडते ते ऐकून सगळा नगर जिल्हा हादरतो कारण ही असामी साधीसुधी नसते, ही असामी असते नगरचे सुविख्यात पत्रकार बाळ बोठे आणि ज्या महिलेची हत्या करण्यात आली त्या महिलेचे नाव होते रेखा जरे, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा..
30 नोव्हेंबरला रेखा जरे यांचा मर्डर झाला आणि नंतर तब्बल 103 दिवसांनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेला अटक करण्यात आली.