Bank Holiday : सलग 6 दिवस बंद राहतील बँका; ऑक्टोबर महिना अखेरीस सुट्ट्याचं-सुट्ट्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळीचा सण उंबरठ्यावर असून धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी यादी जवळपास तयार झाली आहे. घरापासून ते बाजारपेठेपर्यंत सणांचा जल्लोष दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात सुट्ट्याही भरपूर असतात. परंतु जर तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण केले नसेल तर कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करा. कारण उद्यापासून म्हणजेच शनिवार 22 ऑक्टोबरपासून बँका सलग 6 दिवस बंद राहणार आहेत.या महिन्यातील उर्वरित 10 दिवसांपैकी आठ दिवस देशाच्या विविध भागांमध्ये सुट्ट्या असतील. त्यामुळे दिवाळीनंतरही बँकेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असाल तर एकदा कॅलेंडर जरूर तपासा.

दिवाळी आणि भाऊबीज सण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 21 ऑक्टोबरनंतरच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. अनेक राज्यांतील प्रमुख सणांच्या दिवशी फक्त त्या राज्यांतील बँकांना सुट्टी असते. या आठवड्यातील शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह सलग सहा दिवस बँका बंद राहणार आहेत.

ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे

बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. सणासुदीच्या काळात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित काम ऑनलाइन करू शकता. ही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. ऑनलाइन बँकिंगद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार सहज करू शकता. हे देखील लक्षात ठेवा की बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात. शनिवारी तुमच्या ऑफिसला सुट्टी असेल तर तुम्ही या दिवशी जाऊन तुमचे महत्त्वाचे काम करू शकता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशा राहतील सुट्ट्या

22 ऑक्टोबर, चौथा शनिवार, सर्वत्र सुट्टी

23 ऑक्टोबर, रविवार, सर्वत्र सुट्टी

24 ऑक्टोबर, काली पूजा/दिवाळी/लक्ष्मी पूजन/नरक चतुर्दशी – गंगोटक, हैद्राबाद, इंफाळ सोडून सगळीकडे

25 ऑक्टोबर, लक्ष्मी पूजा/दिवाळी/ गोवर्धन पूजा- फक्त गंगोटक, हैद्राबाद, इंफाळ आणि जयपूरमध्ये सुट्टी

26 ऑक्टोबर, गोवर्धन पूजा/ विक्रम सावंत नववर्ष- अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगोटक, जम्मू, कानपुर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिमला आणि श्रीनगरमध्ये सुट्टी राहील

27 ऑक्टोबर/ भाऊबीज – गंगोटक, इंफाळ, कानपुर आणि लखनौ सुट्टी राहील

30 ऑक्टोबर, रविवार – सर्वत्र सुट्टी

31 ऑक्टोबर, सरदार वल्लभभाई पटेल जयंती- रांची, पाटणा आणि अहमदाबाद सुट्टी असेल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT