बीड: एसटी बसचा चक्काचूर.. बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू
रोहिदास हातागळे, बीड: लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस आणि ट्रकच्या हा अपघात एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये संपूर्ण बसचा जवळजवळ चक्काचूर झाला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावजवळ हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून […]
ADVERTISEMENT

रोहिदास हातागळे, बीड: लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस आणि ट्रकच्या हा अपघात एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये संपूर्ण बसचा जवळजवळ चक्काचूर झाला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावजवळ हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून आणखी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेमका अपघात कसा झाला?
आज (9 जानेवारी) सकाळी सात वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एच 20 बी एल टी 3017 ही बस लातूर येथून औरंगाबादकडे मार्गस्थ झाली. पण सायगावच्या जवळ आंबेजोगाईकडून लातूरकडे लोखंडी पाइपची वाहतूक करणारा एका ट्रकाला बसने रॉंग साईडने येऊन प्रचंड जोरदार धडक दिली.
पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरच बस आणि ट्रकचा हा अपघात झाला.