बीड: मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू
बीड: अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16 वर्ष) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18 वर्ष) अशी त्या बहिणींची नावे आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि […]
ADVERTISEMENT
बीड: अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय 16 वर्ष) आणि सानिया अल्ताफ शेख (वय 18 वर्ष) अशी त्या बहिणींची नावे आहेत.
ADVERTISEMENT
अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहतात. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते.
शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडी येथे सोडले होते. स्वाराती रुग्णालयाला जाणाऱ्या रोडलगत कंपनी बागेच्या विहिरीबाहेर शेळ्या चारत असलेल्या एका व्यक्तीला दोन मुलीचे मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
हे वाचलं का?
याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले आहेत. मात्र ही घटना नेमकी कशी घडली हे शवविच्छेदन अहवालनंतर समजणार आहे.
दरम्यान, ही घटना आत्महत्या, घातपात आहे की अपघात मृत्यू याचा देखील आता तपास करावा लागणार आहे. मात्र, एकाच वेळी आपल्या दोन्ही मुली गमवाव्या लागल्याने शेख कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये लोखंडी जाळी पडून पाच मजुरांचा मृत्यू
ADVERTISEMENT
बीड: भरधाव स्कॉर्पिओच्या वेगात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीडमध्येच एका भीषण अपघाता दोन सख्ख्या बहिणींना आपले प्राण गमवावे लागले होते.
रात्रीचं जेवण झाल्यानंतर दारासमोर उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना एका भरधाव स्कॉर्पिओने उडवलं होतं. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या गावात हा अपघात घडला होता. बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या चालकाने पुढे जात चार मित्रांनाही धडक दिली होती.
रोहिणी गाडेकर (वय 22), मोहिनी गाडेकर (वय 26) अशी या दोन सख्ख्या बहिणींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही बहिणी आपल्या गावी काही दिवसांकरता राहण्यासाठी आल्या होत्या. यातली रोहिणी ही नर्सिंगला तर मोहिनी ही एका खासगी कंपनीत कामाला होती. रविवारी रात्रीचं जेवण झाल्यानंतर घरासमोर गप्पा मारत असताना समोरुन आलेल्या भरधाव स्कॉर्पिओने या दोन्ही बहिणींना उडवलं. गंभीररित्या जखमी झालेल्या या दोन्ही बहिणींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर स्कॉर्पिओ चालकाने पुढे जात वाढदिवस साजरा केल्यानंतर गप्पा मारत उभ्या असलेल्या चौघा मित्रांना धडक दिली होती. ज्यात एका मुलगा गंभीर जखम झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT