बीड : जुगार खेळणाऱ्या ५ शिक्षकांचं निलंबन, अजित पवारांची धडक कारवाई

मुंबई तक

बीडमध्ये जुगार खेळणं शिक्षकांना चांगलचं भोवलं आहे. जुगार अड्यावर पडलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या अन गुन्हा दाखल झालेल्या, 5 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे. यामध्ये 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत. 28 डिसेंबर रोजी बीड शहरालगत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बीडमध्ये जुगार खेळणं शिक्षकांना चांगलचं भोवलं आहे. जुगार अड्यावर पडलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या अन गुन्हा दाखल झालेल्या, 5 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे. यामध्ये 3 जण जिल्हा परिषदेचे तर 2 जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत.

28 डिसेंबर रोजी बीड शहरालगत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसापूर्वी जि.प.प्रशासनाने या शिक्षकांची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर काल उशिरा या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक हरिदास जनार्धन घोगरे रा.नंदनवन कॉलनी बीड, प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष भगवान आश्रुबा पवार, रा.काळेगाव हवेली ता.बीड, भास्कर विठ्ठल जायभाय रा. काकडहिरा ता.पाटोदा, अशोक रामचंद्र सानप, रा.कालिकानगर बीड, बंडू किसन काळे रा.कालिकानगर बीड अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दरम्यान या कारवाईने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp