आर्यनच नाही हे आठ सेलिब्रिटीही अडकले होते ड्रग्जच्या विळख्यात
2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर होणारी पार्टी NCB ने उधळून लावली. एवढंच नाही या प्रकरणात बारा जणांना अटक करण्यात आली. यातलं प्रमुख नाव आहे ते आर्यन खान. आर्यन खान शाहरुख खानचा मुलगा आहे. सेलिब्रिटी आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन अनेकदा समोर आलं आहे. मात्र आर्यन हा पहिला सेलिब्रिटी नाही जो ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. […]
ADVERTISEMENT
2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर होणारी पार्टी NCB ने उधळून लावली. एवढंच नाही या प्रकरणात बारा जणांना अटक करण्यात आली. यातलं प्रमुख नाव आहे ते आर्यन खान. आर्यन खान शाहरुख खानचा मुलगा आहे. सेलिब्रिटी आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन अनेकदा समोर आलं आहे. मात्र आर्यन हा पहिला सेलिब्रिटी नाही जो ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. याच्याआधी आठ सेलिब्रिटी असे आहेत जे ड्रग्जच्या विळख्यात अडकले होते. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबाबत.
संजय दत्त
अभिनेता संजय दत्तने आत्तापर्यंत त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये ही कबुली दिली आहे की त्याला तरूणपणात ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्याला जेव्हा त्याची आई म्हणजेच नर्गिस यांना कॅन्सर झाला आहे हे समजलं तेव्हा संजय दत्तला हे व्यसन जडलं होतं. तो जेव्हा एका सकाळी उठला तेव्हा त्याच्याकडे असणारा त्याचा केअरटेकर त्याला पाहून रडू लागला. त्याने संजय दत्तला सांगितलं की तू दोन दिवसांनी उठला आहेस झोपेतून. त्यावेळी संजय दत्तला हे कळलं की आपण ड्रग्जच्या आहारी गेलो आहोत त्याने ही बाब आपले वडील सुनील दत्त यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं तो जेव्हा रिहॅब सेंटरमध्ये गेला तेव्हा त्याला तिथे विचारण्यात आलं की तू कोणतं ड्रग घेतलं आहे त्याला एक यादी देऊन त्यावर खूण करायला सांगितली. त्याने सगळ्या यादीवर खुणा केल्या कारण त्या यादीत असलेलं प्रत्येक ड्रग त्याने घेतलं होतं. संजय दत्तला त्याची ड्रग्जची ही सवय सोडवण्यासाठी वेळ लागला. पण त्या प्रकरणात कधी त्याला अटक झाली नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
फरदीन खान
ADVERTISEMENT
अभिनेता फिरोझ खानचा मुलगा अभिनेता फरदीन खानही या प्रकरणात अडकला होता. प्यार तुने क्या किया या सिनेमाची सक्सेस पार्टी सुरू होती. त्यावेळी आपल्या कुटुंबासोबत फरदीन डीन केल्यानंतर फरदीन त्याची कार घेऊन निघाला. तो एका ड्रग पेडलरला भेटायला गेला. त्याआधी तो एका ATM मध्ये गेला तिथे पैसे काढण्याच्या प्रयत्नात त्याचं कार्ड अडकलं. 5 मे 2001 ला पहाटे तीन वाजता ड्रग्ज खरेदी करताना फरदीन खानला अटक करण्यात आली. फरदीनकडे एक ग्रॅम कोकेन सापडलं होतं त्याची किंमत 2500 रूपये होती. ती कॅश काढण्यासाठीच फरदीन एटीएमधे गेला होता. मात्र त्याचं कार्ड जसं मशीनमधे अडकलं तसंच तो या ड्रग्ज खरेदी प्रकरणात अडकला. त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सांगितलं की नियमित ड्रग्ज घेतो. त्यानंतर फरदीन खानची रवानगी एका डी अॅडिक्शन सेंटरमध्ये करण्यात आली आणि त्यानंतर त्याने ड्रग्ज सोडले असं सांगितलं जातं.
ADVERTISEMENT
विजय राज
2005 ला अभिनेता विजय राज हा त्याचा सिनेमा दिवाने हुए पागल च्या शुटिंगसाठी अबूधाबीला गेला होता. त्यावेळी एअरपोर्टवर त्याच्या हँड बॅगमध्ये ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी विजय राजला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्याला अल-वथबाच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. त्याच्याजवळ सहा ग्रॅम मॅरियुआना मिळालं होतं. मात्र त्याच्याकडे हे ड्रग्ज कुठून आलं याबाबत त्याची चौकशी करण्यात आली. त्यानेही हे सांगितलं की तो ड्रग्ज घेत नाही. त्याने हेदेखील सांगितलं की त्याच्या हँड बॅगमध्ये हे कुठून आलं माहित नाही. अबू-धाबी पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्याच्या ब्लड आणि युरीन टेस्टमध्ये ड्रग मिळालं नाही. भारतीय दुतावासाच्या मदतीने विजयराज याची तिथून सुटका झाली.
सिद्धांत कपूर
सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मोठा मुलगा आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या रेव्ह पार्टी 240 जणांना अटक झाली होती. त्यामध्ये सिद्धांत कपूरही होता. ज्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आढळले. मुंबईतल्या 72 डिग्रीज या ठिकाणी हा छापा मारण्यात आला होता. पोलिसांना छाप्यात 104 एक्स्टेसी टॅबलेट, कोकेन आणि चरस सापडलं. या सगळ्याची किंमत जवळपास 10 लाख रूपये होती. या क्लबमधून सिद्धांतला अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची मेडिकल टेस्ट झाली तो निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
कंगना रणौत
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने हा आरोप केला होता की 99 टक्के बॉलिवूड हे ड्रग्जचं सेवन करतं. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून या सगळ्याला वाचा फोडली. याच दरम्यान एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये कंगना हे मान्य करत होती की ती ड्रग्ज अॅडिक्ट होती. एवढंच नाही तर एके काळी तिचा बॉय फ्रेंड असलेला अध्ययन सुमन यानेही सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते. 2008 मध्ये कंगनाने लीला हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. त्यावेळी तिथे अध्ययनही आला होता. या पार्टीत कंगनाने सांगितलं होतं की आज रात्री सगळे कोकेन घेतील. अध्ययनने याबाबत नकार देताच कंगना आणि अध्ययनचं भांडणही झालं होतं.
प्रतीक बब्बर
प्रतीक बब्बर हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतीकचा जन्म झाल्यानंतर काही काळातच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचं बालपण फारसं चांगलं गेलं नाही तो डिस्टर्ब होता असं त्याने सांगितलं होतं. 2017 मध्ये की त्याने मिड डेमध्ये एक कॉलम लिहिला होता. त्यामध्ये त्याने हे मान्य केलं की तोही ड्रग्ज घेत होता. वयाच्या तेराव्या वर्षापासून तो हशिश आणि मेरियुआना घेऊ लागला होता. एक वेळ अशीही आली होती की प्रतीकने हे पाहणं बंद केल्याने तो अॅडिक्ट झाला होता. त्यानंतर त्यालाही या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी रिहॅब सेंटरचा आधार घ्यावा लागला होता.
7) महेश भट्ट
सिनेमा दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. 2013 मध्ये झालेल्या एका फेस्टिव्हलमध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्यांनी हे सांगितलं होतं की त्यांच्या आयुष्यात एक वळण असंही आलं होतं जिथे ते ड्रग्जच्या आहारी गेले होते. त्याच दरम्यान त्यांची भेट यू. जी. कृष्णमूर्ती यांच्याशी झाली त्यांनी महेश यांची समजूत घातली आणि त्यांना या व्यसनापासून दूर केलं. त्यावेळी मी या व्यसनापासून दूर येऊ शकलो असंही महेश भट्ट यांनी स्पष्ट केलं आहे.
ममता कुलकर्णी
एप्रिल 2016 मध्ये सोलापूरमध्ये असलेल्या एवॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीवर छापा मारला. या ठिकाणी पोलिासंना 20 टन इफेन्ड्रीन सापडलं. या प्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली. तसंच पाच जणांना वाँटेड जाहीर करण्यात आलं. ज्या नावांमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांची नावं होती. पोलिसांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार ममता आणि विकी या दोघांनी केनियामधल्या हॉटेल ब्लिसमध्ये एक मिटिंग केली होती. सोलापूरमधून इफेन्ड्रीन नावाचं ड्रग्ज तिथे नेऊन ते अमेरिकेत विकण्यासंबंधी ही मिटिंग होती. या ड्रग्जची किंमत जवळपास 2 हजार कोटी रूपये होती. इफेन्ड्रीन पावडर ही नाकाने ओढली जाते. या ड्रगपासून पार्ट्यांमध्ये सर्रास वापरलं जाणारं मेथमफेटामाईनही तयार केलं जातं. ज्याला शॉर्टमध्ये मेथ असं म्हटलं जातं. या घटनेनंतर ममता आणि विकी दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी ममताची बँक अकाऊंट्स सील केली आङेत. तसंच तिचे मुंबईत असलेले दोन फ्लॅटही सील केले आहेत.
ADVERTISEMENT