धक्कादायक.. कॉलेजमागे आढळला मुंडकं छाटलेला, नग्नावस्थेतील तरुणीचा मृतदेह!
विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरील एका शेतात एका तरुणीचं मुंडकं छाटलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह हा पूर्णपणे विविस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. याशिवाय तरुणीचं मुंडकं अद्यापही सापडलेलं नाही. अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या या खुनाच्या प्रकरणात आता पोलिसांनी […]
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरील एका शेतात एका तरुणीचं मुंडकं छाटलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह हा पूर्णपणे विविस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. याशिवाय तरुणीचं मुंडकं अद्यापही सापडलेलं नाही. अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या या खुनाच्या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप तरुणीची ओळख पटू शकलेली नाही. या भयंकर हत्येचा छडा लावण्यासाठी आता पोलिसांच्या 9 टीम कामाला लागल्या आहेत.
या हत्येचा छडा लावणं हे पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. कारण मारेकऱ्याने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. यामुळे पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहे. तरुणीची ओळख पटू नये, हत्येमागचा नेमका हेतू काय या सगळ्याचा विचार करुन मारेकऱ्याने तरुणीची सुनियोजितपणे हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मारेकऱ्याला शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण चंद्रपूरमधील भद्रावती शहरातील सुमठाना परिसरातील आहे. येथे जवळच शासकीय ITI कॉलेजच्या समोर असणाऱ्या शेतात एका तरुणीचा मुंडकं गायब असलेला मृतदेह काल दुपारी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.