संजय राऊत यांना पुन्हा एकदा अटक होणार? : न्यायालयानं बजावलं समन्स; काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. यावेळी त्यांच्यावर बेळगावमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. याबाबतच समन्स त्यांना बेळगाव न्यायालयाकडून पाठविण्यात आलं आहे. ३० मार्च २०१८ रोजी केलेल्या भाषणाची दखल घेऊन त्यांना हे समन्स पाठविण्यात आलं आहे. यानुसार त्यांना १ डिसेंबर रोजी बेळगाव न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, संजय राऊत १ डिसेंबरला बेळगाव न्यायालयात उपस्थितीती लावणार असल्याची माहिती आहेत. त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना याबाबतचे संकेत दिले.

संजय राऊत काय म्हणाले?

समन्स मिळाल्यानंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून लढणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना कायदेशीर बाबीमध्ये गुंतवून, बेळगावमध्ये बोलवून हल्ले करायचे असं कारस्थान शिजताना मला दिसत आहे. याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. शिवसेना सीमा भागातील लोकांमागे खंबीरपणे उभी आहे, शिवसेनेने सीमाभागासाठी ६९ हुतात्मे दिले आहे. मी ७० वा हुतात्मा होण्यासाठी तयार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाभागासाठी तीन महिने तुरुंगवास भोगला आहे.

हे वाचलं का?

मला अटकेची भीती नाही :

मला अटकेची भीती नाही, मग ते कर्नाटक सरकार असो किंवा अन्य असो. महाराष्ट्रासाठी जर मला अटक करणार असतील तर नक्कीच बेळगावमध्ये जाऊ. तसंच लपून-छपून जाणार नाही तर हजारो शिवसैनिक कोल्हापूर रस्त्याने जाऊ आणि स्वतःला अटक करवून घेऊ. किती दिवस त्यांना आम्हाला ठेवायचं आहे ते ठेऊ दे, असंही राऊत म्हणाले. सोबतच मी केलेल्या भाषणात प्रक्षोभक काय आहे हे मला अजून माहित नाही. २०१८ च्या भाषणाची दखल आत्ता घेत मला समन्स पाठवण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT