भागवत कराडांचा ‘मविआ’वर आरोप, जयंत पाटील म्हणाले, ‘त्यांनी काही तीर मारलेला नाहीये’

मुंबई तक

राज्यात सध्या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण जोरदार रंगलय. राज्यात येऊ घातलेले मोठंमोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलेलं असताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केलाय. त्याला उत्तर देताना जयंत पाटलांनीही मोठा गौप्यस्फोट करत पलटवार केलाय. फ्लोटिंग सोलार प्रकल्पावरून भागवत कराडांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. भागवत कराड काय म्हणाले, “मराठवाड्यातील कोणताही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात सध्या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण जोरदार रंगलय. राज्यात येऊ घातलेले मोठंमोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलेलं असताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केलाय. त्याला उत्तर देताना जयंत पाटलांनीही मोठा गौप्यस्फोट करत पलटवार केलाय.

फ्लोटिंग सोलार प्रकल्पावरून भागवत कराडांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. भागवत कराड काय म्हणाले, “मराठवाड्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही, पण जायकवाडीवर फ्लोटिंग सोलार व्हावेत म्हणून, वारंवार महाविकास आघाडी सरकार असताना परवानगी मागत होतो. नवीन सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून आम्हाला परवानगी दिलीये. हा प्रकल्प दोन वर्षापूर्वी सुरू झाला असता, तो आता सुरू होणार आहे.”

“जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी महत्त्वाचं आहे. औरंगाबादला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मराठवाड्यातील सिंचन असेल. बाष्पीभवनामुळे ३३ टक्के पाणी कमी होतं. त्यामुळे फ्लोटिंग सोलार प्रकल्प आला, तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकते. महाविकास आघाडी सरकार याला कारणीभूत होतं”, असा आरोप कराडांनी केलाय.

‘भागवत कराडांना लोकसभा लढवायला सांगितलंय’ जयंत पाटलांनी दिलं उत्तर

जयंत पाटील म्हणाले, “भागवत कराडांनी असा आरोप केलाय की महाराष्ट्र सरकारने आणि जयंत पाटलांनी फ्लोटिंग सोलार पॅनेल बसवून वीज निर्मितीचा प्रकल्प नाकारला. असा नकार जयंत पाटलांनी दिला असेल, तर त्यांनी कागद द्यावा. महाराष्ट्र सरकारने करत नाही, असं म्हटलं असेल, तर त्यांची माहिती द्यावी.”