घरावर हल्ला! भास्कर जाधव भडकले; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, ‘आम्हाला मारा, पण माघार घेणार नाही’
ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दगड, स्टम्प्स आणि पेट्रोलच्या बॉटल्स जाधव यांच्या घराच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. या घटनेवर बोलताना भास्कर जाधव यांनी गंभीर विधान केलंय. राज्य सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाला असून, मरेपर्यंत माघार घेणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना […]
ADVERTISEMENT

ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दगड, स्टम्प्स आणि पेट्रोलच्या बॉटल्स जाधव यांच्या घराच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. या घटनेवर बोलताना भास्कर जाधव यांनी गंभीर विधान केलंय. राज्य सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाला असून, मरेपर्यंत माघार घेणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, “पेट्रोल बॉम्बप्रमाणे पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या. दगड, काठ्या लाठ्या फेकल्या आणि सुरक्षारक्षक ओरडल्यानंतर पळून गेले. मी एवढंच सांगेन की, जन्माला आलेला माणूस मरण्यासाठीच आलेला असतो. तो काही अमर नसतो. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीही मरणाला घाबरलेलो नाही. असल्या भुरट्या हल्ल्यांना, तक्रारींना घाबरलेलो नाही. जर असंच होणार असेल, तर जे काय परिणाम होतील, त्याला सामोरं जाण्याची मी माझी तयारी ठेवली आहे.”
“आज सुद्धा मोर्चाला येणार होतो आणि आलो. आता माझं अचानकपणे संरक्षणच काढलं. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात कधी संरक्षण घेतलं नाही. मागितलं नाही. मला संरक्षण मंजूर झालं, तेव्हा मी अनेकवेळा पोलीस अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे. मी कधीही कुणाचा एक पैसा खाल्लेला नाही. बुडवलेला नाही. निवडणुकीला सव्वा रुपया वर्गणीसुद्धा मी गोळा केलेली नाही. मी कधी कुणाचा विश्वासघात केलेला नाही. मी राजकारण माझा व्यवसाय करून करतो. माझं कुटुंब, शेती करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला संरक्षणाची गरज नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.
आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; अंगणात दगड, पेट्रोलच्या बॉटल्स सापडल्या