पत्रा चाळीचं भूमिपूजन, उद्धव ठाकरेंनी चाळीच्या रहिवाशांना घातली ‘ही’ अट
मुंबई: गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबईच्या उपनगरातील पत्रावाला चाळ प्रकल्प अखेर आता मार्गी लागला आहे. कारण आता राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी इमारतींचं पुर्ननिर्माण करणार आहे. याचाच भूमिपूजन सोहळा आज (22 फेब्रुवारी) पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन या […]
ADVERTISEMENT

मुंबई: गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबईच्या उपनगरातील पत्रावाला चाळ प्रकल्प अखेर आता मार्गी लागला आहे. कारण आता राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी इमारतींचं पुर्ननिर्माण करणार आहे. याचाच भूमिपूजन सोहळा आज (22 फेब्रुवारी) पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पत्रा चाळीच्या रहिवाश्यांना एक अटही घातली.
‘एका जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केलात. त्याला सरकारचं सहकार्य लाभलं. म्हणूनच मला असं वाटतं की, मुंबईत अनेकजण येत असतात. पोटापाण्यासाठी येत असतात. जिथे मिळेल तिथे राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्यानंतर कृपा करुन ते सोडून जाऊ नका. ही माझी अट आहे आणि विनंती सुद्धा आहे.’ असं यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
‘अडचणीसुद्धा डोंगराएवढ्या असू शकतात. पण एकदा का विषय सोडवायचा म्हटलं की, तो सोडवला जाऊ शकतो. त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. मुंबईचं महत्त्व मी काही सांगायला नको. मुंबईत आपलं चांगलं सुंदर हक्काचं घर असावं ही जवळपास सगळ्या मुंबईकरांची इच्छा आहेच.’










