Gujrat Election Result : ‘बिलकिस बानो’च्या मतदारसंघात भाजपचं नेमकं झालं तरी काय?
दाहोद : गुजरातच्या दाहोत जिल्ह्यातील लिमखेडा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाभोर शैलेश सुमनभाई 3 हजार 663 मतांनी विजयी झाले आहेत. भाभोर शैलेश सुमनभाई यांना 69 हजार 417 मतं मिळाली. तर विरोधातील आम आदमी पक्षाचे उमेदवार बारिया नरेशभाई पूनाभाई यांना 65 हजार 754 मतं मिळाली. त्याचवेळी काँग्रेसला मात्र इथून डिपॉझिट जप्त होण्यापर्यंतचा दारुण पराभव […]
ADVERTISEMENT
दाहोद : गुजरातच्या दाहोत जिल्ह्यातील लिमखेडा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाभोर शैलेश सुमनभाई 3 हजार 663 मतांनी विजयी झाले आहेत. भाभोर शैलेश सुमनभाई यांना 69 हजार 417 मतं मिळाली. तर विरोधातील आम आदमी पक्षाचे उमेदवार बारिया नरेशभाई पूनाभाई यांना 65 हजार 754 मतं मिळाली.
ADVERTISEMENT
त्याचवेळी काँग्रेसला मात्र इथून डिपॉझिट जप्त होण्यापर्यंतचा दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेस उमेदवार गोंदिया रमेशकुमार बादियाभाई यांना अवघी 8 हजार 963 मतं मिळाली. 2012 आणि 2017 मध्ये दुसऱ्या नंबरवर राहिलेला काँग्रेस पक्ष यंदा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. इथं ‘आप’च्या चांगल्या कामगिरीचा फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जातं आहे.
लिमखेडा मतदारसंघाचं बिलकिस बानो कनेक्शन :
लिमखेडा मतदारसंघ चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यंदा मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान लिमखेडा मतदारसंघ देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघाचं असलेलं ‘बिलकिस बानो’ कनेक्शन. बिलकिस बानो याच मतदारसंघातील रणधीकपुर या गावात वास्तव्याला आहेत.
हे वाचलं का?
निवडणुकीच्या काही दिवस आधीच देशभरात बिलकिस बानोचं प्रकरण चर्चेत आलं होतं. त्याचं कारण 2002 च्या गुजरात दंगलीत ज्यांनी बिलकिस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या केली त्यांची सुटका करण्यात आली होती. राज्य सरकारच्याच धोरणानुसार त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.
दोषींच्या सुटकेची बातमी येताच केवळ गुजरात नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण तापलं होतं. काँग्रेससह सर्वचं विरोधकांनी गुजरात सरकार आणि भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. देशभरात या गोष्टीविरोधात आंदोलनं करण्यात आली. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण इथल्या जनतेनं पुन्हा एकदा भाजपवरचं विश्वास दाखविला आहे.
ADVERTISEMENT
लिमखेडा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?
बिलकिस बानो प्रकरणानंतर 2002 मध्ये इथून भाजपला विजय मिळाला होता. तर 2017 मध्ये काँग्रेसनं बाजी मारली होती. 2012 पासून मात्र हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. भाभोर शैलेश सुमनभाई इथून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मतदारसंघातील जात आणि धर्म फॅक्टरबद्दल सांगायचं झालं तर लिमखेडा मतदारसंघात हिंदू मतदार सर्वाधिक आहेत. तर मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT