घरात पाण्यासोबत साप-विंचू येतात, भाजप कार्यकर्त्यांचं गटारात बसून आंदोलन
पावसाळ्यात अनेक शहरांमध्ये नागरी वस्तीत नाल्याचं पाणी घरात येत असल्याच्या घटना घडत असतात. कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले नगरात राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून हाच त्रास सहन करावा लागतो आहे. नाल्याचं पाणी घरात येऊन घाणीसोबत साप आणि विंचू देखील घरात येत असल्यामुळे स्थानिकांनी आज महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं ज्यात भाजप कार्यकर्तेही सहभागी झाले होते. महात्मा फुले […]
ADVERTISEMENT
पावसाळ्यात अनेक शहरांमध्ये नागरी वस्तीत नाल्याचं पाणी घरात येत असल्याच्या घटना घडत असतात. कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले नगरात राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून हाच त्रास सहन करावा लागतो आहे. नाल्याचं पाणी घरात येऊन घाणीसोबत साप आणि विंचू देखील घरात येत असल्यामुळे स्थानिकांनी आज महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं ज्यात भाजप कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT
महात्मा फुले नगरात गेल्या काही दिवसांपासून नाल्याचं काम सुरु आहे. हा नाला ज्या भागातून काढण्यात आला आहे त्या भागात स्थानिकांच्या दोन गटातील वादामुळे या नाल्याचं काम प्रलंबित आहे असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतू या वादाचा फटका आता स्थानिक लोकांना बसायला लागला आहे.
या नाल्याचं पाणी जायला मार्ग उरला नसल्यामुळे पावसात हे पाणी घरात शिरुन साप-विंचू घरात शिरत असल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे याविरोधात वारंवार तक्रार करुनही कोणतंही पाऊल उचलण्याच येत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT