Chinchwad by-election : अश्विनी जगतापांनी चिंचवड जिंकलं; कलाटेंमुळे ‘मविआ’चा गेम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chinchwad Assembly by-election :

ADVERTISEMENT

चिंचवड : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभा मतदासंघ पोटनिवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळविला आहे. तब्बल ३६ हजार १६८ मतांनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव केला. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) ४४ हजार ११२ मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं होतं. (BJP candidate Ashwini Jagtap won in Chinchwad Assembly by-election)

चिंचवडमधील थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यात पोस्टल फेरीपासूनच जगताप यांनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतदानात जगताप यांना ४०५३ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ३६०४ पोस्टल मतं आणि अपक्ष राहुल कलाटेंना १२७३ मतं मिळाली. त्यानंतर प्रत्येक फेरीत जगताप यांनी आघाडी कायम राखली.

हे वाचलं का?

Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

भाजपच्या दिग्गजांनी केला होता प्रचार :

दरम्यान, कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने प्रचारात दिग्गजांना उतरवलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि इतर अनेक नेत्यांनी चिंचवडमध्ये जाऊन जगताप यांचा प्रचार केला होता.

ADVERTISEMENT

राहुल कलाटेंनी केला काटेंचा गेम?

दरम्यान, या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा खेळ बिघडवला असल्याची चर्चा आहे. चिंचवडची जागा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढविणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी देईल असा तर्क लढविण्यात येत होता.

ADVERTISEMENT

Chinchwad Bypoll Results 2023: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव, कलाटेंची बंडखोरी भोवली

मात्र, अगदी शेवटच्या क्षणी नाना काटे यांना (Nana Kate) उमेदवारी देण्यात आल्याने नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: राहुल कलाटेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करुनही राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम राहिले. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली.

त्यानंतर कलाटे यांना शिवसेना (UBT) चा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला मिळणारी शिवसेना (UBT) आणि वंचितची मत कलाटे यांना मिळाल्याची चर्चा आहे. यातूनच कलाटे यांनी तब्बल ४४ हजार ११२ मत घेतली. तर काटे यांना ९९ हजार ४३५ मत मिळाली. काटे आणि जगताप यांच्यामधील मतांचे अंतर ३६ हजार १६८ इतकं राहिलं. त्यामुळेच कलाटे यांनी काटे यांचा खेळ बिघडवला आणि भाजपचा विजय सोप्पा झाला असं बोललं जातं आहे.

निकालाची अंतिम आकडेवारी (पोस्टल मतदान धरून) :

  • अश्विनी जगताप (भाजप) – १,३५,४३४+१६९ = १ लाख ३५ हजार ६०३

  • नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९९,३४३+९२ = ९९ हजार ४३५

  • राहुल कलाटे (अपक्ष)- ४४०८२+३० = ४४ हजार ११२

३६ हजार १६८ मतांनी अश्विनी जगताप विजयी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT