मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

मुंबई तक

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते सगळं काही ठीक होईल असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांच्या या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते सगळं काही ठीक होईल असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीत रवाना झाले आहेत. शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्लीत आहेत. तर देवेंद्र फडणवीसही आज दिल्लीत पोहचले आहेत.

एवढंच नाही तर गुरूवारपासूनच दिल्लीत भाजपचे नेते गेले आहेत. रात्री उशिरा चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसही त्याचवेळी भेटणार होते मात्र ते उशिरा पोहचल्याने त्यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांनी अशीही माहिती दिली आहे की महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट शिवसेनेच्या एका राज्यसभा खासदाराशीही झाली आहे. हा नेता उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानला जातो आहे.

‘बंद दाराआड ठरलं तेच अमित शाहांनी नाकारलं, हेच का तुमचं हिंदुत्व?’

दरम्यान आता नारायण राणे यांचा दावा समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या आहेत त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतं आहे असं म्हणत नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp