असे अनेक ठाकरे-पवार, फडणवीस खिशात घेऊन फिरतात ! निलेश राणेंची सरकारवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवरुन आज राज्यात भाजप आक्रमक झाला आहे. मुंबईतील फडणवीस यांच्या सागर या अधिकृत निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतुन फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीची होळी करत आहेत. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं […]
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवरुन आज राज्यात भाजप आक्रमक झाला आहे. मुंबईतील फडणवीस यांच्या सागर या अधिकृत निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतुन फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीची होळी करत आहेत. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणेंनी शरद पवारांसह संजय राऊत या सर्वांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या केस टाकून त्यांना घाबरवून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण फडणवीस त्यांना पुरुन उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशा शब्दात राणेंनी सरकारवर निशाणा साधला.
‘शरद पवार हेच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस’, निलेश राणेंचं स्फोटक वक्तव्य
हे वाचलं का?
संजय राऊत पवारांचा माणूस –
संजय राऊत यांना आता किती सिरीअसली घ्यायचं हे पत्रकारांनी ठरवायचं आहे. आतापर्यंत त्यांनी किती विषय तडीस नेले हे सांगावं. संजय राऊत हे १०० टक्के पवारांचा माणूस, पगार सामनाचा घेतात आणि इमानी शरद पवारांची करतात. शिवसेनेला संपवून एक दिवस संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होतील असंही भाकीत यावेळी बोलत असताना निलेश राणेंनी वर्तवलं.
ADVERTISEMENT
‘राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी’, राज ठाकरे यांचा नेमका रोख काय?
ADVERTISEMENT
राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही –
राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही. शरद पवार हे दाऊदचा माणूस असल्याचा मला संशय आहे. आता महाराष्ट्रात संशय देशील घेतला जाऊ शकत नाही का असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला. निलेश राणेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरीही आपण गप्प बसणार नाही असंही निलेश राणेंनी यावेळी स्पष्ट केलं.
‘ते’ वक्तव्य भोवणार?; निलेश राणे, नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
नवाब मलिक प्रकरणावर बोलत असताना राणेंनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अटक होण्यापूर्वी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो. मग नवाब मलिक तर जेलमध्ये आहेत, तर मग त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? नवाब मलिक शरद पवारांचे कोण लागतात? असं निलेश राणे म्हणाले.
अमित शाहांना फोन केल्याचं नारायण राणे धडधडीत खोटं बोलले; पोलिसांची न्यायालयात माहिती
अर्थसंकल्पावरुन अजित पवारांवरही साधला निशाण –
नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. यावर भाष्य करताना निलेश राणेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला. “अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थखातं किती कळतं हे मला माहिती नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. अलोकेशन ऑफ फंड आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ फंड यात फरक आहे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी आहे, मला बजेट माहिती आहे. मराठी भवनासाठी प्रत्येकवेळा निधी दिला जातो मग आजवर एकही विट का रचली गेली नाही?”
Maharashtra Budget 2022-23: अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
कोकणातील गड-किल्ल्यांसाठी निधी जाहीर केले जातात. परंतू प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत चालले आहेत. वित्तीय तूट कशी झाली यावर अजित पवार काही बोलतील का? त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे हेच माहिती आहे असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवरही गंभीर टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT