एका जागेने केला घोळ, कुडाळमध्ये राणेंचं वर्चस्व धोक्यात ! सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लगेच पुढच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. कुडाळची नगरपंचायत अवघ्या एका जागेमुळे राणेंच्या हातातून निसटणार असल्याचं चित्र तयार झालंय. १७ जागांपैकी भाजपला यंदा ८ जागांवर समाधान मानावं लागलेलं असून शिवसेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार आता किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. जिल्हा […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लगेच पुढच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. कुडाळची नगरपंचायत अवघ्या एका जागेमुळे राणेंच्या हातातून निसटणार असल्याचं चित्र तयार झालंय. १७ जागांपैकी भाजपला यंदा ८ जागांवर समाधान मानावं लागलेलं असून शिवसेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत.
ADVERTISEMENT
त्यामुळे कुडाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार आता किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. जिल्हा बँक ताब्यात घेतल्यानंतर नारायण राणे स्थानिक नगरपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीला धोबीपछाड देणार का म्हणून सर्वांचं या निवडणुकीकडे लक्ष होतं. परंतू कुडाळमध्ये राणेंना धक्का बसल्याचं चित्र पहायला मिळतंय.
नाराज शिवसैनिकांचं बंड मोडून काढण्यात पक्षाला यश, दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विजयी
हे वाचलं का?
कुडाळमध्ये कविलकट्टा भागातली जागा भाजपने अवघ्या एका मताने गमावली आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही स्थानिक निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कुडाळमध्ये भाजपला अपयश आलेलं असलं तरीही वैभववाडीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
१७ जागांपैकी ९ जागा भाजपने जिंकल्या असून शिवसेनेला ५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. उर्वरित ३ जागांवर अपक्ष विजयी झाले असून यातील दोन अपक्ष हे भाजप पुरस्कृत असल्यामुळे वैभववाडीत भाजपची सत्ता निश्चीत मानली जात आहे.
ADVERTISEMENT
विधानसभा, जिल्हा बँक आणि नगरपंचायत, साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवाची हॅटट्रीक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT