कधी म्हणतात हेच आमचे ‘साहेब’,कधी म्हणतात हेच आमचे ‘राव’;KCR-ठाकरे भेटीवर आशिष शेलारांची टीका

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भेटीने सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. रविवारी चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन भविष्यात भाजपविरुद्ध आघाडीची चर्चा केल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांच्या बैठकीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काव्यात्मक पद्धतीने टीका केली आहे. शिवसेनेने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भेटीने सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. रविवारी चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन भविष्यात भाजपविरुद्ध आघाडीची चर्चा केल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांच्या बैठकीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काव्यात्मक पद्धतीने टीका केली आहे.

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांच्या घेतलेल्या भेटीवरुन आशिष शेलार यांनी टीका करत मोदींची साथ सोडल्यापासून शिवसेनेची किती धावाधाव होते आहे असा उपरोधीक टोला लगावला आहे. पाहा काय म्हणतात आशिष शेलार….

यावेळी हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या वेळी आलेला अनुभव सांगत आशिष शेलारांनी भाजपने चंद्रशेखर राव यांना कसा धक्का दिला होता याचीही आठवण आशिष शेलार यांनी शिवसेनेला करुन दिली.

दरम्यान एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही, उद्धव-KCR भेटीवरुन सत्ताधारी शिवसेनेला डीवचलं आहे. “काल झालेली पत्रकार परिषद मी काही ऐकलेली नाही पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतात ही काही नवीन गोष्ट नाहीये. तेलंगणाचे हे मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री असताना मला येऊन भेटले होते त्यामुळे या भेटीत मला विशेष काहीही वाटत नाही”, अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी दिली.

BMC ची निवडणुक जिंकणारच ! KCR यांच्यासोबत भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आत्मविश्वास

भाजपविरुद्ध आघाडीची सुरुवात ठाकरे-KCR भेटीतून महाराष्ट्रातून होणार याबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “यांनी मागच्या लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी केली, परंतू याचा काहीही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी असा प्रयोग करुन पाहिला पण कुठेही याचा परिणाम झाला नाही. आता तेलंगणामध्ये टीआरएसची पार्टी अशी आहे की मागच्या लोकसभेत भाजपच्या ४ जागा इथे निवडून आल्या. पुढच्या निवडणुकीत भाजप तिकडे एक नंबरचा पक्ष असेल”.

पवारांच्या हातात हात,चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यात सिंघमचा ‘जयकांत शिक्रे’ ठरला चर्चेचा विषय

हे वाचलं का?

    follow whatsapp