BJP आमदार जयकुमार गोरेंच्या वडिलांना घातपाताची शंका, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP MLA Jaykumar Gore Father: पुणे: साताऱ्यातील (Satara) माण मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore)यांच्या कारला आज (24 डिसेंबर) पहाटे भीषण अपघात (Car Accident) झाला. ज्यामध्ये त्यांची कार ही थेट पुलावरुन 30 फूट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आमदार जयकुमार गोरेंसह कारमधील चारही जण जखमी झाले. दरम्यान, याच अपघाताबाबत जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी मात्र शंका व्यक्त केली आहे. (bjp mla jayakumar gores father bhagwan gore doubts it was an assassination attempt not an accident)

ADVERTISEMENT

जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांना जेव्हा अपघाताची माहिती समजली तेव्हा त्यांनी तात्काळ पुण्यात जाऊन आपल्या मुलाची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पाहा जयकुमार गोरेंचे वडील नेमकं काय म्हणाले:

‘ज्या ठिकाणी अपघात झाला.. ते ठिकाण काय अपघात होण्यासारखं नाही. कठडा तोडून गाडी जाते हे कसं काय होतं? मला तर शंका आहे की, तिथे काही तरी घातपात झाला आहे. माझं जयकुमार यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले की, माझी तब्येत बरी आहे. तुम्ही घरी जा सगळ्यांनी.’

हे वाचलं का?

‘हे फलटणमध्येच घडतंय गावात.. त्यामुळे मला शंका आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय?’ अशी प्रतिक्रिया देत जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस कशा पद्धतीने चौकशी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

आज पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास फलटणजवळ पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. आमदार गोरे यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरील संरक्षक कठड्याला धडक देऊन गाडी थेट 30 फूट खाली कोसळली, सुदैवाने पुलाखाली फारसे पाणी नसल्याने मोठी दुर्घटना यावेळी टळली.

ज्यावेळी गाडीला अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण चार जण प्रवास करत होते. अपघातात आमदार गोरे यांच्या छातीला मार लागला असल्याने त्यांना पुण्याती रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. तर गाडीमधील इतर 2 गंभीर जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात अर्टिगा कारचा चक्काचूर, पाच जण ठार तर तीन जखमी

अपघातानंतर गोरेंनी कोणाला केला पहिला फोन?

भीषण अपघातानंतरही आमदार जयकुमार गोरे हे घाबरले नाही किंवा डगमगले नाही. स्वत: जखमी झालेले असतानाही त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना सगळ्यात आधी धीर दिला. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रसंगावधान राखत

सर्वात आधी सुशांत निंबाळकर आणि नंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना फोन करुन झाल्या घटनेची माहिती देत तात्काळ मदत मागितली.

पहाटे-पहाटे आलेल्या फोनने सुशांत निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांनीही घटना गंभीर असल्याचं ओळखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT