Nitesh Rane यांची मतदारांना धमकी : “माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंधुदुर्ग : विविध वक्तव्यांमुळे सातत्याने अडचणीत येत असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये आमदार नितेश राणे यांच्याही नावाची भर पडली आहे. “ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही, निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा” असा धमकी वजा इशाराच नितेश राणे यांनी मतदारांना दिला असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सर्वपक्षीय नेते व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांचं हे वक्तव्य असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल, त्यात गावाचा मी विकास करीन, नाहीतर करणार नाही स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहेत. आपण लपाछपवीवाले नाही. राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक पोटात असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराच्या सरपंच झाला नाही तर मी एकही रुपयांचा निधी देणार नाही. एवढी काळजी निश्चितपणे घेईन.

हे वाचलं का?

याला आता तुम्ही धमकी समजा नाहीतर अन्य काही. आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात ठेवा, सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा विकास निधी असो, 25:15 चा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारमध्ये, सत्तेत असलेला आमदार आहे.

जिल्हाधिकारी असो, पालकमंत्री असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगरं नितेश राणेंच्या विचाराच्या सरपंच आला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

ADVERTISEMENT

यापूर्वीही धमकी दिल्याचा आरोप :

नितेश राणे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी गजानन प्रभू यांनीही धमकी दिल्याचा आरोप केला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजपत प्रवेश करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी धमकी दिली असून, आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने हे जबाबदार असतील, असा आरोप नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केला होता.

ADVERTISEMENT

तुम्ही 10 दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजपत प्रवेश करावा, अन्यथा आम्ही तुम्हाला बदनाम करायला सुरूवात करणार. तुम्ही खोटी बिलं काढली, असा आरोप मी करणार. त्यात तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या नगरसेवकांना अडकवणार, अशी धमकी दिली. तसंच, तुम्ही भाजपमध्ये आल्यास २५ लाख रुपये देऊ, शिवाय नगराध्यक्ष पदही देऊ, अशी ऑफरही नितेश राणे यांनी दिली असल्याचा आरोप प्रभू यांनी केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT