Varun sardesai : आदित्य ठाकरेंच्या जवळचा युवा नेताही चौकशीच्या जाळ्यात!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जाणार वरुण सरदेसाई हे चौकशीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झालीये. आमदार योगेश सागर यांनी वरूण सरदेसाईंचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. हिंदुस्थान स्काऊट्स गाईड संस्थेच्या माध्यमातून वरुण सरदेसाईंनी शेतकऱ्यांच्या मुलांकडून प्रत्येकी 8 ते 10 लाख रुपये वसूल केली असून, त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार सागर यांनी केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती फडणवीसांनी दिली.

आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत वरूण सरदेसाईंचं नाव घेत फसवणुकीचे गंभीर आरोप केले. “एखाद्या पक्षाचे उभरते नेते आणि ज्यांना पुढे राजकीय पक्ष चालवायचा आहे. पक्षश्रेष्ठींच्या जवळची लोकं जेव्हा अशा प्रकारचे उद्योग किंवा धंदे किंवा आरोपाला सामोरं जात असतील, तर ही राज्यासाठी अतिशय भयंकर, गंभीर प्रकारची घटना आहे.”

आमदार सागर पुढे म्हणाले, “संस्थेचं नाव आहे हिंदुस्थान स्काऊट्स अॅण्ड गाईड. या संस्थेचे अध्यक्ष आहेत वरूण सरदेसाई. संस्थेचे सचिव रुपेश कदम आहेत. खजिनदार आहेत पंकज चौरागडे. हिंदुस्थान स्काऊट्स अॅण्ड गाईड ही मान्यताप्राप्त संस्था असल्याचं भासवून, ट्रेनिंग देऊन शाळेत स्काऊट गाईडचे प्रशिक्षण म्हणून कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल, असं सांगून गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून प्रत्येक मुलाकडून 8 ते 10 लाख रुपये घेतले.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावामुळे ‘मविआ’तील मतभेद चव्हाट्यावर?

शेतकऱ्यांच्या मुलांनी जमिनी विकून 10-10 लाख दिले -योगेश सागर

“शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विकून पैसे दिलेत. 10-10 लाख रुपये घेतले. त्यातील काही मुलांना ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवलं. उमेश नानाजी काकडे (भद्रावती, चंद्रपूर), हेमंत भाकरे (गडचिरोली), सचिन वाडे (चंद्रपूर), सुशील वाकडे (वरोरा), योगश धानोरकर (भद्रावती), भूषण मेडपल्लीवार (गडचिरोली), महेश बोदलकर (गडचिरोली) अशा अनेक मुलांकडून 8 ते 10 लाख रुपये घेतले”, असा आरोप सागर यांनी केलाय.

ADVERTISEMENT

“गोंदियात एक आभासी शाळा उभी केली. तिथे ट्रेनिंग दिलं. मुलं ट्रेनिंगला गेली. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. ती मुलं तिकडे गेली. त्या शाळांनी या मुलांना हाकलून दिलं. हिंदुस्थान स्काऊट्स गाईडसोबत आमचा काहीही संबंध नाही, असं त्या शाळांनी सांगितलं,” अशी माहिती सागर यांनी विधानसभेत दिली.

ADVERTISEMENT

“फसवणूक झाल्यानंतर त्या मुलांनी पंकज चौरागडेला फोन केले. त्यांना सांगण्यात आलं की, हे पैसे आम्ही वरूण सरदेसाईंना दिले आहेत. पैसे परत आले, तर पैसे तुम्हाला परत करतो. त्या मुलांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यांची भेट झाली की नाही माहिती नाही. पण, त्यांचं संभाषण माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये आहे,” असा दावा आमदार सागर यांनी केला आहे.

ठाकरेंचे केसरकरांना ५ प्रश्न: सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ‘सामना’

“या संभाषणात त्या मुलांना सांगण्यात आलंय की, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात. आता तुम्हाला जे करायचं ते करा. आमच्याकडून तुम्हाला पैसे दिले जाणार नाही. सरकार आल्यानंतर (महाविकास आघाडीचं) या स्काऊट्स गाईड संस्थेनं किती मुलांना फसवलं, याची माहिती काढणं आवश्यक आहे. याची चौकशी झाली पाहिजे. मुलांना न्याय मिळाला पाहिजे”, अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी केलीये.

हिंदुस्थान स्काऊट्स अँण्ड गाईड फसवणूक प्रकरणाची चौकशी करणार -फडणवीस

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘योगेश सागर यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. सरकार निश्चितपणे याची चौकशी करेल,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT