Ahmadnagar : “बाहेरच्या लोकांनी येऊन…”; विखे पाटलांनी पडळकरांना फटकारलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या याबद्दल काय भावना आहेत ते महत्त्वाच्या आहे, असं म्हणतं भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना फटकारलं आहे. ते मंगळवारी पुण्यात बोलत होते. दरम्यान, यामुळे अहमदनगर जिल्हाच्या नामांतराची मागणी करणाऱ्या पडळकर यांची स्थानिक पातळीवर स्वपक्षातूनच मोठी कोंडी झाली आहे.

ADVERTISEMENT

यापूर्वी पडळकर यांच्या याच भूमिकेशी अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही असहमती दर्शविली आहे. आता अहमदनगरच्या पालकमंत्र्यांनीही मुलाच्या सुरात सूर मिळवत पडळकरांच्या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तसंच याविषयी मी स्वतः पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता या मागणीवरुन पडळकर यु-टर्न घेणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

पडळकर यांनी केलेल्या मागणीवर विखे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, अहमदनगर नामकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. अनेक वर्षे आपण औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याची मागणी आपण ऐकत आलो आहोत. मात्र नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे. जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण केली जात असल्याच देखील ते यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

पडळकर माझे मित्र आहेत. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. तसंच त्यांनी मांडलेल्या भावना त्यांच्या स्वतःच्या होत्या. ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं ते त्यांनी व्यक्त केलं. या प्रश्नाचं विनाकारण काही लोक राजकारण करत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गट बसून आम्ही यावर चर्चा करू. असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

आज राज्यात अनेक मोठे जिल्हे आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्याच्या विभाजनांची चर्चा केली जात आहे. पण जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करत आहोत? ठाण्यात ७ महापालिका होत्या. तशी तरी परिस्थिती अहमदनगरमध्ये नाही. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायला आम्ही घेतला आहे. औद्योगिक पर्यटन या जिल्ह्याच्या क्षमतेतून रोजगार निर्मिती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. असंही विखे-पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT