शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा भाजपचा प्रयत्न-शरद पवार
शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर आणि मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार? ”देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी […]
ADVERTISEMENT

शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर आणि मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?
”देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिलं आहे. काश्मीर फाईल्ससारख्या सिनेमांमधून खोटा प्रोपगंडा उभा केला जातो आहे. देशात काय परिस्थिती आहे हे दिसून येतं आहे. देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढतो आहे. या शक्तींच्या विरोधात उभं राहण्याची आवश्यकता आहे. काश्मीर फाईल्ससारख्या सिनेमाला संमती देण्याची काहीच गरज नव्हती. ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे तेच या सिनेमाचा प्रचार करत आहेत. भाजपचं सरकार देशात आलं तेव्हापासून संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जातो आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा हेतुपुस्सर प्रयत्न केला जातो आहे.” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.










