अभिनेत्री यामी गौतमला ED चं समन्स, ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने यामी गौतमला ही नोटीस पाठवल्याचं कळतंय. आतापर्यंत ईडीने यामीला पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. ७ जुलैला यामीला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामीने आपल्या खासगी बँक खात्यातून परदेशी चलनाची देवाणघेवाण केली होती. या व्यवहारासंदर्भात […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने यामी गौतमला ही नोटीस पाठवल्याचं कळतंय. आतापर्यंत ईडीने यामीला पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे.
ADVERTISEMENT
७ जुलैला यामीला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामीने आपल्या खासगी बँक खात्यातून परदेशी चलनाची देवाणघेवाण केली होती. या व्यवहारासंदर्भात यामीने यंत्रणांना माहिती दिली नव्हती. यामीच्या बँक खात्यातून झालेले हेच व्यवहार ईडीच्या रडावर आले असून यासंदर्भात तिची चौकशी केली जाणार आहे.
यामीने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक जाहीरातींमध्येही ती झळकली आहे. उरी, काबिल, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विक्की डोनर, बाला, बदलापुर, टोटल सियापा, Action Jackson यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. काही दिवसांपूर्वी यामीने उरी सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत हिमाचल प्रदेशमध्ये लग्न केलं. यामीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT