लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट, 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने लतादीदींना एक खास गिफ्ट मिळणार आहे. दिग्दर्शक विशाल भारतद्वाज आणि कवी गुलजार यांनी 26 वर्षांपूर्वी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. हे गाणं आज रिलिज होणार आहे. ‘ठिक नहीं लगता’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं एका सिनेमासाठी रेकॉर्ड करण्यात आलं होतं पण नंतर ते गाणं रिलिज होऊ शकलं नाही आता हे गाणं लता मंगेशकर यांच्या 92 वाढदिवशी म्हणजेच आजच रिलिज केलं जाणार आहे.

ADVERTISEMENT

हे गाणं विशाल भारतद्वाज यांचं लेबल व्ही. बी. म्युझिक आणि मौज App यांच्या संयुक्त विद्यमाने हे गाणं रिलिज केलं जाणार आहे. सोमवारी एका डिजिटल माध्यमातून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याद्वारे ही माहिती विशाल भारतद्वाज यांनी दिली आहे. माचिस या सिनेमाच्याही आधी ठीक नहीं लगता हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. हे गाणं एका सिनेमासाठी रेकॉर्ड करण्यात आलं. मात्र हा सिनेमाच होऊ शकला नाही त्यामुळे हे गाणंही तसंच राहिलं.

हे वाचलं का?

विशाल भारतद्वाज काय म्हणाले?

‘आम्ही ‘ठीक नहीं लगता’ हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. दुर्दैवाने हा सिनेमा रिलिज होऊ शकणार नाही. त्यामुळे हे गाणं रिलिज झालं नाही. आम्ही दीर्घ काळ हा विचार करत होतो की हा सिनेमा तयार होईल. मात्र दहा वर्षे प्रयत्न करूनही आम्हाला कळलं की हा सिनेमा होऊ शकत नाही. ज्या टेपवर लतादीदींचं गाणं रेकॉर्ड झालं होतं ती टेप हरवली होती, तसंच तो रेकॉर्डिंग स्टुडिओही बंद झाला. मात्र दोन वर्षांपूर्वी एका दुसऱ्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ही टेप मिळाली या टेपच्या कव्हरवर विशाल भारतद्वाज हे नाव लिहिलं होतं.’ आम्ही ही टेप कोणती आहे हे तपासलं तेव्हा लक्षात आलं की हे लतादीदींचं तेच गाणं आहे जे हरवलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आम्ही याबाबत लता मंगेशकर यांना याबाबत कळवलं त्यावेळी एका ऑडिओ संदेशात लता दीदी यांनाही आनंद झाला. त्यांनी एक ऑडिओ संदेश पाठवला आणि हे गाणं मिळाल्याचा आनंद आणि त्याबाबतच्या त्यांच्या भावनाही सांगितल्या. ते गाणं आजही प्रासंगिक आहे म्हणूनच लतादीदी यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही ते आज रिलिज करणार आहोत असंही विशाल भारद्वाज यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT