बॉलिवूडचा ‘टारझन’ हेमंत बिर्जेचा एक्सप्रेस वेवर अपघात, पती-पत्नी जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: बॉलिवूडमधील ‘टारझन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हेमंत बिर्जे (Hemant Birje) याचा मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. हेमंत बिर्जे कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री एका दुभाजकाला धडकली. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नीही कारमध्ये होती. या अपघातात पती आणि पत्नी जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये हेमंत यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही होती. यात हेमंत आणि त्यांच्या पत्नीला इजा झाली आहे. मात्र, सुदैवाने मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उर्से टोल प्लाझाजवळ ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात अभिनेता हेमंत (Hemant Birje Road Accident)आणि त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्याची माहिती शिरगाव पोलीस चौकीचे निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली.

हे वाचलं का?

जेव्हा अपघात झाला तेव्हा हेमंत बिर्जे यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील कारमध्ये होती. सुदैवाने यात त्यांच्या मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातानंतर बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला पुण्याजवळील पवना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून सध्या त्या दोघांवरही उपचार सुरु आहेत.

हेमंतला बॉलिवूडमध्ये ‘टारझन’ म्हणूनच ओळख मिळाली होती. त्याने ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आजही ‘टारझन’चं नाव आलं की लोकांना अभिनेता हेमंतचा चेहरा आठवतो.

ADVERTISEMENT

जळगाव अपघात : लग्नाचे कपडे विसरणं पडलं महागात, कारच्या ताशी ११० वेगाने केला घात, लग्नघरी शोककळा

ADVERTISEMENT

हेमंतने ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ (1985) व्यतिरिक्त इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हेमंत बिर्जे यांनी आज के अंगारे, वीराना, सिंदूर और बंदूक, सौ साल बाद, तहखाना, आज के शोले, जंगली टारझन, लष्कर, इके पे इक्का अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, टारझन सिनेमात त्याला जे यश मिळालं, ते इतर चित्रपटांमधून नाही मिळू शकलं.

त्याने सुपरस्टार सलमान खानसोबत (Superstar Salman Khan) 2005 मध्ये ‘गर्व प्राइड अँड ऑनर’ (Film Garv) या चित्रपटातही काम केले होते. तसेच त्याने मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT