Chhagan Bhujbal : 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान
Chhagan Bhujbal Latest News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फुटली. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचे निरीक्षण भुजबळ यांनी नोंदवले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
छगन भुजबळ यांचे विधान चर्चेत
शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सभा चांगल्या होताहेत, असे भुजबळ म्हणाले.
'चारशे पार'च्या घोषणेबद्दल भुजबळांनी व्यक्त केली नाराजी
Chhagan Bhujbal Sharad Pawar Uddhav Thackeray : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फुटली, त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे, असे विधान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी 'चारशे पार'च्या घोषणेबद्दलही चिंता व्यक्त केली. (Chhagan Bhujbal big Statement. he said that, Sympathy Wave For Leader Uddhav Thackeray and Sharad Pawar in Maharashtra.)
ADVERTISEMENT
राहुल गांधी म्हणताहेत की, एनडीएला बहुमत मिळाले तर संविधान बदलले जाईल. 'चारशे पार'च्या घोषणेंची चर्चा होत आहे. त्या घोषणेमुळे एनडीएला नुकसान होईल, असं तुम्हाला दिसतंय का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता.
संविधान बदलाचा प्रचार जोरात, भुजबळांची कबुली
त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, "विरोधकांचा हा जो प्रचार आहे, तो जोरात आहे. लोकांना असं वाटतंय की, हे जे चारशे पार बोलत आहेत, ते संविधान बदलण्यासाठी आहे."
हे वाचलं का?
हेही वाचा >> काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र हिसकावून घेईल? Exclusive मुलाखतीत खरगेंचं नेमकं उत्तर
"कर्नाटकातील कुणीतरी भाजपचा खासदार आहे, तेही एक वेळा बोलले आहेत की, 'हो, आम्ही संविधान बदलू.' मोदीजी वारंवार सांगताहेत की संविधान इतकं मजबूत आहे की, खुद्द बाबासाहेब आंबेडकरही आता बदलू शकत नाही. पण, हा प्रचार लोकांमध्ये होत आहे, हे खरंय आहे आणि याचा किती परिणाम लोकांमध्ये होत आहे. हे आता मतपेट्या उघडल्या जातील, तेव्हाच कळेल."
हेही वाचा >> ''रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या...राणे शिवसेनेत असेपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही''
शरद पवार आणि उद्धव ठाकरे एनडीएला किती नुकसान पोहोचवताहेत? कारण तुम्ही जमिनीवरचे नेते आहात, तुम्हाला माहितीये स्थानिक पातळीवर काय चाललंय? असा प्रश्नही भुजबळांना विचारण्यात आला.
ADVERTISEMENT
पवार-ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेबद्दल भुजबळ काय बोलले?
या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, "एक गोष्ट आहे की, ज्यापद्धतीने त्यांच्या प्रचारसभा होताहेत, मला वाटतंय की, सहानुभूती आहे... उद्धव ठाकरेंची शिवसेना तुटली, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट इकडे आला (भाजपसोबत)... तर लोकांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे. आणि त्यामुळे त्यांच्या प्रचारसभा चांगल्या होताहेत. असं नाही की, २०१४ मध्ये, २०१९ मध्ये सोपी गेली तसं वाटत नाहीये. तरीही लोकांना विश्वास आहे की मोदीजी सरकार बनवतील आणि मजबूत सरकारसाठी मोदीजी हवेत", असे मत भुजबळ यांनी मांडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT