अमेरिकेतला जन्म, घरात श्रीमंती…तरीही मुलगा पुण्यात येऊन बनला सराईत चोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे स्थानकातून एका आरोपीला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानक परिसरात अज्ञात चोरटा प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

या आरोपीचा जन्म अमेरिकेत झाला असून त्याची पार्श्वभूमी सधन घरातली असल्याचं समोर आलं आहे. नोएल शबान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पुणे रेल्वे स्थानक ते ससून रुग्णालय परिसरात नोएल प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळायचा. याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी या भागात पेट्रोलिंग वाढवलं. ज्यानंतर शेकडो सीसीटीव्ही तपासले. यावेळी एका सीसीटीव्हीत पोलिसांना नोएल दिसून आला.

यानंतर पोलिसांनी सापळा रचून नोएलला पोलिसांनी अटक केली. ज्याच्याकडून पोलिसांनी तपासाअंती १८ मोबाईल आणि चार दुचाकी जप्त केल्या. नोएलची आजी ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात राहते. या भागात त्यांचे मॉल्सही आहेत. नोएलचा जन्म अमेरिकेत झाला. पाच वर्ष त्याला आजीने सांभाळल्यानंतर वडिलांनी त्याला पुण्याच्या घरी आणलं. नोएलच्या वडिलांचं निधन झालं असून त्यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल होता. नोएलची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT