हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा – अनिल परबांचं किरीट सोमय्यांना आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दापोली येथील अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांमुळे आज राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. दापोलीत किरीट सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर घणाघाती आरोप केले. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना किरीट सोमय्यांना थेट आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

“सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की तो रिसॉर्ट माझा नाही. या रिसॉर्टच्या बाबतीत सर्व चौकश्या झाल्या आहेत, कागदपत्र तपासली आहेत. विविध यंत्रणांनी ही कागदपत्र तपासली आहेत. या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही हे मी याआधीही सांगितलंय आणि त्यासाठी कोर्टातही याचिका दाखल केली आहे. परंतू किरीट सोमय्या वारंवार हे दाखवतायत की हा माझा रिसॉर्ट आहे. सोमय्यांनी कागदोपत्री हे सिद्ध करुन दाखवावं”, अशा शब्दात अनिल परबांनी थेट सोमय्यांना आव्हान दिलं आहे.

सोमय्यांना हातोडा घेऊ द्या, फावडं घेऊ द्या; आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही – विनायक राऊत

हे वाचलं का?

यावेळी बोलत असताना अनिल परबांनी सोमय्यांना थेट आव्हान देताना हिंमत असेल तर त्यांनी रिसॉर्ट तोडून दाखवावं. ते काय पालिकेचे नोकर आहेत का की तोडायला जाणार आहेत? ज्या संस्थांना हा अधिकार आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. सोमय्या वातावरण खराब करतायत. मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे. संबंध नसताना वारंवार आरोप करुन माझी प्रतिमा मलीन केली जात आहे. किरीट सोमय्यांकडू संभ्रम निर्माण केला जात असल्याचंही अनिल परब म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT