मारणे विरुद्ध मोहोळ – जाणून घ्या पुण्याच्या टोळीयुद्धाची कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खुन खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुण्यापर्यंत अशी वाजत-गाजत मिरवणूक काढली. ५०० गाड्यांच्या ताफ्यासह तळोजावरुन निघालेला गजा मारणेच्या समर्थकांचा ताफा प्रत्येक टप्प्यावर नियम मोडत होता. पुण्यात दाखल झाल्यानंतर कोथरुड पोलिसांनी कोरोना काळाज जमावबंदीचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करत गजा मारणेला पुन्हा अटक केली. परंतू या प्रसंगाने पुण्यातील टोळीयुद्ध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वर्चस्ववादाच्या लढाईला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे.

अवश्य वाचा – पुण्यातील तरुणाईला गुंडांचं आकर्षण का वाटतंय?

विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे मोहोळ, मारणे, घायवळ यासारख्या गँग कशा तयार झाल्या हे आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करुया….

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहे गजानन मारणे हे थोडक्यात समाजवून घेऊया…

पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्याप्रकरणी गजा मारणेला २०१४ साली अटक करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे हे सुरुवातीला मारणे टोळीत काम करायचे. पण यानंतर त्यांनी मारणे टोळीतून फुटून दुसरीकडे काम करण्यास सुरुवात केली. यामधूनच दोघांचीही हत्या करण्यात आली होती. पप्पू आणि अमोल बधेच्या हत्येप्रकरणात गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळपासून मारणे तुरुंगात होता. सुरुवातीच्या काळात मारणेला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर जेलमध्ये करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्याला तळोजा जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

पुणे आणि लगतच्या ग्रामीण भागात साधारण ९० च्या दशकात शेती व्हायची. त्या काळात लोकांच्या भावनाही शेतीशी जोडल्या होत्या. पण शेती करुन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शेती विकून त्यातून करोडो पैसे मिळतात हे शेतकऱ्यांना समजायला लागलं. २००० नंतर पुण्याचा चेहरा बदलायला लागला. आयटी क्षेत्र पुण्यात यायला सुरुवात झाली होती त्यामुळे पुण्याच्या आजुबाजूच्या गावातील जमिनींना भाव यायला लागले. कॉर्पोरेट कंपन्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी एजंटची गरज भासायला लागली. मग यातून समोरच्या व्यक्तीला धमकावणं, जागा मोकळी करण्यासाठी बळाचा वापर करणं असे प्रकार वाढायला लागले आणि यातून मारणे, मोहळ, घायवळ अशा गँग तयार झाल्या.

ADVERTISEMENT

आता या टोळ्यांबद्दल एवढं आकर्षण का आहे असा अनेकांना प्रश्न पडला असेल…पण याचं उत्तर आपणच शोधण्याचा प्रयत्न केला तर असं समजेल की सोशल मीडियावर ही मंडळी आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करतात. अंगात सोन्याच्या चैन, महागड्या गाड्या आणि एखादं फिल्मी म्युझीक असलेले व्हिडीओ टाकले की गावातली तरुण मुलं यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आपलं रोल मॉडेल मानायला लागतात. मग अशाच मुलांना आपल्या टोळीत सामिल करुन या गँग आपली कामं करवून घेतात. कामं झाली की रोखरक्कम आणि खायची-प्यायची चंगळ असा कार्यक्रम ठरलेला असतो.

२००६ मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहळने हत्या केली. यानंतर पुण्यात टोळीयुद्धाने वेग धरला…बाबा बोडकेच्या हत्येचा बदला म्हणून मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली. हे चक्र असंच सुरु राहिलं आणि २०१० साली संदीप मोहळचा नातेवाईक शदर मोहळने आपल्या भावाच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असलेल्या किशोर मारणेची हत्या केली.

अवश्य वाचा – तुरुंगातून सुटलेल्या गजा मारणेला पुन्हा अटक, शक्तीप्रदर्शन भोवलं

मध्यंतरी पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याचा वापर करुन या टोळ्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला….पण पौड, पिरंगूट, कोथरुड यासारख्या भागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी मारणे, मोहोळ, घायवळ गट आजही सक्रीय आहेत. आपल्या गँगमध्ये आखाड्यातली मुलं सामिल करुन घेतली की आपली वट वाढते आणि मसल पॉवरसाठीही यांचा उपयोग होतो अशी पुण्यातल्या गँगची कार्यपद्धती आहे. गजा मारणेच्या सुटकेनंतर त्याची निघालेली मिरवणूक आणि यानंतर त्याला झालेली अटक यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकणार नाही हे आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT