कितीही मोठे गुंड आणा, दाऊदला आणलंत तरीही घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणार – किरीट सोमय्यांचं सरकारला आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुम्ही कितीही मोठे गुंड आणा, अगदी दाऊद-इब्राहीम ला आणलंत तरीही मी घोटाळ्याबाबत खुलासे करत राहीन असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे घोटाळेबाज आहेत, त्यांनी १९ बंगल्यांचा घोटाळा केला आहे. शिवसेनेची लोकं मला गोळ्या घालण्याची धमकी देत आहेत परंतू मुंबई पोलीस त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत”, असं म्हणत सोमय्यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनमधील ११४ फ्लॅट्सना OC मिळाली नाही. भूषण गगराणी या अधिकाऱ्यांनीही हे काम अधिकृत करता येणार नाही असं बोलून दाखवल्यामुळे प्रताप सरनाईक यांची मालमत्ता विकून ठाणे महापालिकेने थकबाकी गोळा करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हे वाचलं का?

आपण ज्या १२ मंत्र्यांची नाव घेतली ते सर्व गुन्हेगार असून शरद पवार त्यांना पाठीशी घालत असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरेंनी माझं तोंड बंद करण्याचे आदेश दिले आहेत म्हणूनच आपल्यावर वारंवार हल्ले होत असल्यामुळे केंद्र सरकारने आपल्याला झेड सिक्युरीटी दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याबद्दल आणखी एक खुलासा पुण्यात पत्रकार परिषदेत करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT